Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prasad Sawkar : संगीत रंगभूमीचा सुवर्णस्वर हरपला; ज्येष्ठ अभिनेते-गायक प्रसाद सावकार यांचे निधन, मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी

Padma Shri पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते आणि गायक प्रसाद सावकार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. 'अवघा रंग एकचि झाला' या गाजलेल्या संगीत नाटकातील त्यांच्या भूमिकेची आजही आठवण काढली जाते.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 18, 2026 | 09:14 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी संगीत रंगभूमी आणि कलाक्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते, गायक आणि संगीत रंगभूमीचे दिग्गज कलाकार प्रसाद सावकार यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.आपल्या दमदार अभिनयाने, मधुर आवाजाने आणि रंगभूमीवरील अजरामर कामगिरीने प्रसाद सावकार यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. संगीत नाटकांच्या सुवर्णकाळातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून त्यांची ओळख होती.

मराठी संगीत रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या गायकीतील भावपूर्णता आणि अभिनयातील सहजता यामुळे त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
प्रसाद सावकार हे मूळचे गोव्याचे असून त्यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून वृध्दापकाळामुळे ते रंगभूनू आणि अभिनय क्षेत्रापासून लांब होते. प्रसाद सावकार यांच्या निधनामुळे मराठी नाट्य आणि संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कलाकार, रसिक आणि चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

प्रसाद सावकार यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना २००६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तत्कालीन राष्ट्रपती A. P. J. Abdul Kalam यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.प्रसाद सावकार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये काम केले. त्यापैकी ‘अवघा रंग एकचि झाला’ हे संगीत नाटक विशेष लोकप्रिय ठरले. जुन्या आणि नव्या पिढीतील रसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला होता. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि गायकीने प्रसाद सावकार यांनी या नाटकाला वेगळी उंची मिळवून दिली होती.

दरम्यान, या नाटकातील त्यांचे सहकलाकार Amol Bawdekar यांनी प्रसाद सावकार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सावकार यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा उल्लेख केला असून, त्यांच्या जाण्याने मराठी संगीत रंगभूमीने एक मोठा कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

प्रसाद सावकार यांच्या निधनानंतर अभिनेते आणि गायक Amol Bawdekar यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावुक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “एक अवलिया गेला, एका संगीत युगाचा अंत झाला… भावपूर्ण श्रद्धांजली! आज संगीत नाट्य रंगभूमीचा एक दैदिप्यमान तारा, एक लिजेंड आदरणीय श्री. प्रसाद सावकार (माझे लाडके आप्पा) वयाच्या ९८ व्या वर्षी अनंतात विलीन झाले. आज त्यांचा शेवटचा सूर लागला आणि संगीत रंगभूमी पोरकी झाली.”

पुढे त्यांनी प्रसाद सावकार यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याचाही उल्लेख केला. “माझे वडील आप्पांची गाणी ऐकायचे आणि मलाही ऐकवायचे. ते मला नेहमी म्हणायचे, ‘अमोल, गायचं असेल तर यांच्या सारखं गाणं गा.’ माझं भाग्य असं की, मला ‘अवघारंग’ या नाटकात स्वतः आप्पांसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली,” असे त्यांनी म्हटले.

Chetan Bhagat : पोरं मोठी झाली! जुळ्या मुलांच्या पदवीप्राप्तीनंतर चेतन भगत भावूक; सोशल मीडियावरील पोस्टची जोरदार चर्चा

त्यांनी पुढे लिहिले, त्यांनी लिहिले, “नाटकात त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका केली होती—ते बाप आणि मी मुलगा! हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संचित आहे. पण हे नातं फक्त नाटकापुरतं किंवा रंगमंचापुरतं मर्यादित राहिलं नाही. नाटक बंद झालं, वर्षं सरली, पण आप्पांनी माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही.”

पुढे ते म्हणाले, “जरी नाटकात ते माझे वडील होते, तरी माझ्यावर माया मात्र त्यांनी अगदी एका आजोबांसारखी केली. मला नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आणि ते आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहतील.”

 

‘इस्त्रीने चटके, बेडवर ढकललं अन्..’, मालिकेत रोमान्सच्या नावाखाली घरगुती हिंसाचार; प्रेक्षकांचा संताप!

प्रसाद सावकार यांच्या निधनाने झालेल्या वैयक्तिक दुःखाचाही त्यांनी उल्लेख केला. “आज आप्पा गेले… माझ्या डोक्यावरचा एक हक्काचा, मायेचा हात हरपला. संगीत रंगभूमीचा हा सुवर्णकाळ आता केवळ स्मृतींमध्ये जिवंत राहील. आप्पा, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि भावपूर्ण श्रद्धांजली! तुमच्या आठवणी आणि तुम्ही दिलेली माया माझ्या मनात आयुष्यभर कायम राहील. ओम शांती!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमोल बावडेकर यांच्या या भावनिक श्रद्धांजलीतून प्रसाद सावकार यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचा मोठेपणा आणि सहकलाकारांशी असलेला जिव्हाळा अधोरेखित होतो. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीतील एका सुवर्ण पर्वाचा अंत झाल्याची भावना अनेक कलाकार आणि रसिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Prasad sawkar death marathi theatre veteran actor singer passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Death
  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
1

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
2

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
3

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
4

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.