Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजीच्या स्वरांचा वारसा नातीने जपला! प्रियांका बर्वे घेऊन आली विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित रचना ‘विठ्ठलाचे भेटी’

आषाढी वारीनिमित्त गायिका प्रियांका बर्वे ने 'विठाई' प्रकल्पातील पहिले भक्तिगीत 'विठ्ठलाचे भेटी' प्रदर्शित केले आहे. विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित रचना प्रथमच रसिकांसमोर आली असून, हा प्रकल्प त्यांच्या संगीतवारशाला वाहिलेली भावपूर्ण आदरांजली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 22, 2026 | 11:27 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

आषाढी वारीच्या पावन निमित्ताने गायिका प्रियांका बर्वेने रसिकांसाठी एक खास संगीत भेट आणली आहे. ‘विठाई’ या तीन भक्तिगीतांच्या संगीतप्रकल्पातील पहिले गीत ‘विठ्ठलाचे भेटी’ प्रदर्शित झाले असून, विशेष म्हणजे ही दिवंगत विदुषी मालती पांडे बर्वे यांची अप्रकाशित मूळ रचना प्रथमच अधिकृतपणे रसिकांसमोर आली आहे.

प्रियांका बर्वे हिच्यासाठी हा प्रकल्प केवळ एका नव्या गाण्याचे प्रकाशन नाही, तर आपल्या आजीच्या संगीतवारशाला आदरांजली वाहण्याचा भावनिक क्षण आहे. त्या अवघ्या चार वर्षांच्या असताना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात आजींसोबत पहिल्यांदा रंगमंचावर गायल्या होत्या. पुढे मालती पांडे बर्वे यांच्याकडून मिळालेले संगीताचे संस्कारच त्यांच्या संगीतप्रवासाचा मजबूत पाया ठरले.

याबाबत बोलताना प्रियांका म्हणाली, “माझ्यासाठी आजी फक्त एक उत्तम गायिका नव्हती, तर त्या माझ्या पहिल्या गुरू होत्या. मी सात वर्षांची असतानाच त्यांचं निधन झालं. मात्र पहाटेच्या रियाजाचे स्वर, घरी येणारे शिष्य आणि संगीताने भारलेलं वातावरण आजही तितकंच जिवंत आहे. आज त्यांच्या मूळ रचनेला रसिकांपर्यंत पोहोचवणं ही माझ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे.”

‘अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय…’, राहुल गांधींना ताब्यात घेताच मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; सरकारवर साधला निशाणा

‘विठाई’ या प्रकल्पाची निर्मिती प्रियांका बर्वे आणि तिचे पती, निर्माता व संगीत संयोजक सारंग कुलकर्णी यांनी ‘द प्रियारंग प्रोजेक्ट’ अंतर्गत केली आहे. या रचनेबाबत बोलताना सारंग म्हणाले, “या रचनांना आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता. मूळ रचनेचा आत्मा आणि भाव कायम ठेवत ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हेच आमचं उद्दिष्ट होतं.”


‘Frame’च्या शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं? तिसऱ्याच दिवशी दिग्दर्शक पटवर्धन झाले होते नर्व्हस, सांगितला BTS किस्सा

‘विठ्ठलाचे भेटी’ या गीताला कवी सुधांशू यांचे शब्द लाभले असून, ही विदुषी मालती पांडे बर्वे यांची मूळ रचना आहे. संगीत संयोजन सारंग कुलकर्णी यांनी केले असून, अभय ओक यांच्या बासरीसह तबला, पखवाज, तालवाद्य आणि समूहगायनाचा सुरेल संगम या गीताला भक्तिरसाची वेगळी उंची देतो.

१४ जुलै २०२६ रोजी यूट्यूबवर प्रदर्शित झालेलं ‘विठ्ठलाचे भेटी’ हे ‘विठाई’ प्रकल्पातील पहिले गीत असून, उर्वरित दोन भक्तिगीतेही लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहेत. पारंपरिक भक्तिसंगीताचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न संगीतप्रेमींसाठी निश्चितच खास ठरणार आहे.

Web Title: Priyanka barves special musical tribute on ashadhi wari honours grandmother malati pande barve through viththalache bheti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट
1

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
2

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!
3

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं
4

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.