Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Chopra: प्रियंका चोप्राच्या हातावर सजलं पती निक जोनसचं नाव, करवा चौथच्या मेहंदीचा फोटो शेअर करत विचारला भन्नाट प्रश्न

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने करवा चौथसाठी हातावर काढलेल्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी साखरेचा पाक चालेल का, असा मजेशीर प्रश्न तिने विचारला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2026 | 12:32 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Priyanka Chopra: जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली असली, तरी तिचं भारतीय संस्कृतीशी असलेलं नातं आजही कायम आहे. भारतीय सण आणि परंपरा ती तितक्याच उत्साहाने साजऱ्या करते. याचीच झलक तिच्या करवा चौथच्या तयारीतून पाहायला मिळाली आहे. प्रियांकाने तिच्या हातावरील मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यावर पती निक जोनसचं नावही पाहायला मिळत आहे.

करवा चौथसाठी प्रियांकाची खास तयारी

प्रियांका चोप्रा अनेकदा तिच्या कुटुंबासोबत साजऱ्या होणाऱ्या भारतीय सणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने घरी साजऱ्या केलेल्या दसरा आणि कन्या पूजनाचे फोटो पोस्ट केले होते. आता करवा चौथच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर हातावरील मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत.

परदेशात राहत असूनही भारतीय सणांशी जोडलेली राहणारी प्रियांका तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या करवा चौथच्या तयारीची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.

हातावर काढली पती निक जोनसच्या नावाची मेहंदी

प्रियांकाने तिच्या हातावरील मेहंदीचा फोटो शेअर करत स्वतःच्या हाताने मेहंदी काढल्याचं सांगितलं. या फोटोसोबत तिने करवा चौथ साजरा करणाऱ्या महिलांना शुभेच्छाही दिल्या. मेहंदीच्या डिझाइनमध्ये पती निक जोनसचं नावही दिसत आहे.

तिने आणखी एका स्टोरीमध्ये मेहंदीचा क्लोज-अप फोटो शेअर केला. त्यासोबत ‘गली में आज चांद निकला’ हे गाणंही जोडलं. तसेच चंद्राच्या प्रतीक्षेबद्दल कॅप्शन देत तिने करवा चौथच्या वातावरणाची झलक दाखवली.

‘ब्रा न घालता शर्टची बटणं उघडी ठेव’; राधिका आपटेसमोर विचित्र मागणी, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

‘साखरेचा पाक चालेल का?’ प्रियांकाचा मजेशीर प्रश्न

मेहंदीचा रंग अधिक गडद व्हावा, यासाठी प्रियांकाने एक मजेशीर प्रश्न विचारला. तिने स्टोरीमध्ये लिहिलं, ‘प्रश्न असा आहे की, साखरेचा पाक चालेल का? ज्यांना माहिती आहे, त्यांना समजेल.’

पारंपरिक पद्धतीनुसार मेहंदी सुकत असताना काही जणी तिच्यावर साखर आणि लिंबाच्या मिश्रणाचा हलका थर लावतात. यामुळे मेहंदी जास्त वेळ ओलसर राहण्यास मदत होते आणि रंग गडद होण्यास हातभार लागू शकतो.

प्रियांकाच्या या प्रश्नातून तिला मेहंदीच्या पारंपरिक पद्धतींबद्दल उत्सुकता असल्याचं दिसून येतं. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिचा साधा आणि आपुलकीचा अंदाज पाहायला मिळाला आहे.

परदेशात राहूनही भारतीय संस्कृतीशी घट्ट नातं

प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असली, तरी भारतीय सण साजरे करण्याची तिची परंपरा कायम आहे. कुटुंबासोबतचे सण, पारंपरिक विधी आणि सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमधून ती भारतीय संस्कृतीशी जोडलेली असल्याचं दिसतं.

Aamne Saamne Natak Controversy: ‘त्या दीड हजारांसाठी तडकाफडकी रिप्लेस केलं’; रोहन गुजर-केतकी पालव यांचा नवा व्हिडीओ चर्चेत

Web Title: Priyanka chopra applied karwa chauth mehendi with husband nick jonas name ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • entertainment
  • karwa chauth
  • nick jonas
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

Ashok Saraf: कुर्ता-धोतर नेसून लॅम्बोर्गिनीमध्ये बसले अशोक सराफ; स्वप्नील जोशीची कमेंट चर्चेत
1

Ashok Saraf: कुर्ता-धोतर नेसून लॅम्बोर्गिनीमध्ये बसले अशोक सराफ; स्वप्नील जोशीची कमेंट चर्चेत

‘ब्रा न घालता शर्टची बटणं उघडी ठेव’; राधिका आपटेसमोर विचित्र मागणी, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
2

‘ब्रा न घालता शर्टची बटणं उघडी ठेव’; राधिका आपटेसमोर विचित्र मागणी, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Aamne Saamne Natak Controversy: ‘त्या दीड हजारांसाठी तडकाफडकी रिप्लेस केलं’; रोहन गुजर-केतकी पालव यांचा नवा व्हिडीओ चर्चेत
3

Aamne Saamne Natak Controversy: ‘त्या दीड हजारांसाठी तडकाफडकी रिप्लेस केलं’; रोहन गुजर-केतकी पालव यांचा नवा व्हिडीओ चर्चेत

Ranbir Kapoor: लेक राहाच्या सवयीबद्दल रणबीर कपूरने सांगितली खास गोष्ट; रोज सकाळी ऐकते हनुमान चालीसा,म्हणाला…
4

Ranbir Kapoor: लेक राहाच्या सवयीबद्दल रणबीर कपूरने सांगितली खास गोष्ट; रोज सकाळी ऐकते हनुमान चालीसा,म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.