Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Puja Banerjee Baby: ‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा झाली आई; लेकीची पहिली झलक केली शेअर

Puja Banerjee Baby: पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. त्यांच्या घरी मुलीचं आगमन झालं असून पूजाने लेकीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 16, 2026 | 09:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Puja Banerjee Baby: ‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि तिचा पती कुणाल वर्मा यांच्या घरी आनंदाचं आगमन झालं आहे. दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचा जन्म झाला आहे. या आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

पूजाने इन्स्टाग्रामवर एक छोटासा व्हिडिओ शेअर करत आपल्या नवजात मुलीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. ‘माझ्या मुलीची पहिली झलक’ असं कॅप्शन देत तिने हा खास क्षण शेअर केला. मात्र, मुलीचा चेहरा किंवा तिच्याबद्दलची अधिक माहिती अभिनेत्रीने सार्वजनिक केलेली नाही. कुटुंबाचा हा खास क्षण तिने खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

यूट्यूब व्हिडिओमधून दाखवले खास क्षण

पूजा आणि कुणाल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुलीच्या जन्माशी संबंधित काही खास क्षण पाहायला मिळतात. नर्सने मुलीच्या जन्माची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नसल्याचं दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये पूजाचा मोठा मुलगा आपल्या लहान बहिणीला पहिल्यांदा भेटतानाही दिसतो. मुलीच्या जन्माची घोषणा होताच या सेलिब्रिटी जोडप्याच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे

एप्रिलमध्ये केली होती प्रेग्नन्सीची घोषणा

पूजा आणि कुणाल यांनी एप्रिल २०२६ मध्ये यूट्यूब व्हिडिओद्वारे पूजाच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या गर्भधारणेबद्दलचा आनंद व्यक्त केला होता. तिने प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट समजल्यानंतरचा खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर केला होता.

पूजाने गंमतीने ‘गर्भधारणेच्या समस्या आणि त्यांचे उपाय’ असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स आणि हार्ट इमोजींचा वर्षाव केला होता.

२०२० मध्ये पहिल्यांदा झाले होते आई-बाबा

पूजा आणि कुणाल यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्या मुलाचं स्वागत केलं होतं. आता त्यांच्या कुटुंबात आणखी एका सदस्याची भर पडली आहे. दुसऱ्यांदा पालक होण्याचा अनुभवही या दोघांनी आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

टीव्ही मालिकांमध्ये केलंय काम

पूजा बॅनर्जीने ‘देवों के देव… महादेव’ आणि ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. तर कुणाल वर्माने ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘हवन’, ‘देवों के देव… महादेव’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. लाइफ पार्टनर होण्यापूर्वी या दोघांनी व्यावसायिक आयुष्यातही एकत्र काम केलं आहे.

Web Title: Puja banerjee kunal verma welcome baby girl first glimpse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • newborn baby

संबंधित बातम्या

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
1

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
2

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो
3

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video
4

Abhijeet Sawant: जुनं घर, गणपती बाप्पा अन् आठवणींचा खजिना; अभिजीत सावंतने शेअर केला खास Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.