Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6: राखीने केली हद्द पार? प्राजक्ताच्या चेहऱ्यावर फेकलं पीठ! संपूर्ण घरातले उठले पेटून

Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वात राखी आणि प्राजक्ता यांच्यातील वादामुळे घरात मोठा गोंधळ उडाला. राखीने रागाच्या भरात प्राजक्ताच्या चेहऱ्यावर पीठ फेकल्याने इतर सदस्य तिच्या विरोधात उभे राहिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात रोज नवे वाद, नवे टास्क आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. या सिझनमध्ये राखीच्या एन्ट्रीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. तिच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे अनेकदा घरातील सदस्य अस्वस्थ झाल्याचे दिसून आले आहे. सध्या सोशल मीडियावर शोचा एक प्रोमो प्रचंड व्हायरल होत असून त्यात राखी आणि इतर सदस्यांमध्ये मोठा वाद झाल्याचे दिसते.

धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड

काय घडलं नेमकं?

प्रोमोमध्ये सुरुवातीला राखी आणि प्राजक्ता यांच्यात शाब्दिक बाचाबाची होताना दिसते. वाद इतका वाढतो की राखी स्वयंपाकघरातून पीठ घेऊन येते आणि ते थेट प्राजक्ताच्या चेहऱ्यावर फेकते. या कृतीमुळे घरातील वातावरण चांगलेच तापते. प्राजक्ताच्या समर्थनार्थ इतर सदस्य पुढे येतात. सचिननेही तेच पीठ उचलून राखीच्या चेहऱ्यावर टाकल्याचे दिसते. विशालही या वादात सहभागी होत राखीविरोधात उभा राहतो.

या सर्व प्रकारानंतर घरात एकच गोंधळ उडतो. राखीने प्राजक्ताला झाडूचा टास्क करण्यास सांगितले होते; मात्र प्राजक्ताने नकार दिल्यानंतर राखी संतापली. रागाच्या भरात तिने खुर्ची आपटली आणि काही कठोर शब्दही वापरले. विशेषतः सचिनबाबत तिने केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण झाले.

घरातील सदस्यांची भूमिका

या घटनेनंतर बहुतांश सदस्य राखीच्या विरोधात उभे राहिल्याचे दिसते. घरात दोन गट पडल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. एका बाजूला राखी तर दुसऱ्या बाजूला इतर सदस्य असा संघर्ष रंगताना दिसत आहे. प्रेक्षकांमध्येही या प्रकारावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

यंदाचे नॉमिनेटेड सदस्य

या आठवड्यात एकूण नऊ जण नॉमिनेट झाले आहेत. त्यात रुचिता जामदार, सचिन, रोशन भजनकर, सागर कारंडे, दीपाली सय्यद, राकेश बापट, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने यांचा समावेश आहे. त्यामुळे या आठवड्यातील एलिमिनेशन अधिकच रोमांचक ठरणार आहे.

The 50: आता हेच बघायचं बाकी होत! निक्की-अरबाजचं ब्रेकअप? नातं संपलं…, म्हणाली ‘मी त्याच्यासाठी माझ्या कुटुंबाला…’ 

प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

राखीच्या या कृतीनंतर बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार, घरातील सदस्य तिच्याविरोधात काही कारवाई करतील का, तसेच प्रेक्षकांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाद, भावना आणि रणनीती यांचा संगम असलेला हा आठवडा निश्चितच थरारक ठरणार आहे.

Web Title: Rakhi sawant fought with prajakta shukre in bigg boss marathi house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Rakhi Sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.