Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakshabandhan 2026: अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत; बहिणींची जबाबदारी पालकाप्रमाणे सांभाळतात हे कलाकार

Rakshabandhan 2026: अर्जुन कपूर, सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान आणि कार्तिक आर्यन हे आपल्या बहिणींची पालकाप्रमाणे काळजी घेतात. जाणून घ्या त्यांच्या खास नात्याबद्दल.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 28, 2026 | 08:28 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Rakshabandhan 2026:  भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा खास सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळत असून, बॉलिवूडमध्येही सेलिब्रिटी भाऊ-बहिणी हा सण मोठ्या आनंदात साजरा करत आहेत. राखीच्या या खास निमित्ताने आज आपण बॉलिवूडमधील अशा काही भावांबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या बहिणींची केवळ भावाप्रमाणेच नव्हे तर पालकाप्रमाणेही काळजी घेतात.

अर्जुन कपूर-अंशुला कपूर

अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची धाकटी बहीण अंशुला कपूर यांच्यातील बॉन्डिंग कायमच चर्चेत असते. दोघेही निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत मोना शौरी कपूर यांची मुलं आहेत. आईच्या निधनानंतर अर्जुनने अंशुलाला प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली.

अर्जुन हा अंशुलासाठी केवळ मोठा भाऊ नाही, तर तिचा ‘सेफ स्पेस’ आणि भावनिक आधारही आहे. अंशुला याच वर्षी रोहन ठक्करसोबत विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नावेळी आणि विशेषतः विदाईच्या प्रसंगी अर्जुन भावूक झालेला पाहायला मिळाला होता.

अर्जुन केवळ अंशुलाचीच नाही तर वडील बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचीही काळजी घेतो. जान्हवी आणि खुशीदेखील अर्जुनला राखी बांधतात.

सलमान खान-अलवीरा आणि अर्पिता खान

बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान हा आपल्या कुटुंबीयांसाठी कायमच खंबीरपणे उभा राहतो. इंडस्ट्रीत कोणालाही मदतीची गरज असेल तर पुढे येणारा सलमान आपल्या बहिणींबाबतही तितकाच काळजीवाहू आहे.

सलमान आपल्या बहिणी अलवीरा खान अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा यांची विशेष काळजी घेतो. विशेषतः धाकटी बहीण अर्पितासोबत त्याचे खास नाते आहे. तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी सलमान कायम तिच्या पाठीशी उभा राहतो.

शाहरुख खान-शहनाज लालारुख खान

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आपल्या कुटुंबासाठी किती भावनिक आहे, हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. शाहरुखची मोठी बहीण शहनाज लालारुख खान असून, दोघांमध्ये घट्ट नाते आहे.

आई-वडिलांच्या निधनानंतर शहनाज यांना मोठा धक्का बसला होता. त्या काळात त्या बराच काळ शांत आणि अस्वस्थ राहिल्या. अशा कठीण प्रसंगी शाहरुखने बहिणीला मजबूत आधार दिला. रिपोर्ट्सनुसार, शहनाज आपल्या भावाच्या कुटुंबासोबत मुंबईतील त्यांच्या ‘मन्नत’ या घरात राहतात.

शाहरुखची राखी बहीण म्हणून पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही नाव घेतले जाते. त्या शाहरुखला राखी बांधतात.

सैफ अली खान-सबा आणि सोहा अली खान

अभिनेता सैफ अली खान याच्या दोन धाकट्या बहिणी म्हणजे सबा अली खान आणि सोहा अली खान. सैफ आपल्या दोन्ही बहिणींबाबत प्रोटेक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते.

मात्र, सैफ या नात्यात केवळ मोठा भाऊ म्हणून अधिकार गाजवण्यापेक्षा बहिणींना समान स्थान देण्यावर विश्वास ठेवतो. गरज पडल्यास तो धाकटी बहीण सबाचा सल्लाही घेतो. त्यामुळे त्यांच्या नात्यातील परस्पर आदर आणि विश्वासही विशेष आहे.

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

कार्तिक आर्यन-कृतिका तिवारी

अभिनेता कार्तिक आर्यन आणि त्याची धाकटी बहीण डॉ. कृतिका तिवारी यांच्यातही खास बॉन्डिंग आहे. कृतिका या व्यवसायाने डॉक्टर असून हेअर ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट आहेत.

कार्तिक अनेकदा बहिणीसोबतचे मजेशीर व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दोघांमधील मस्ती चाहत्यांना आवडते. मात्र, बहिणीच्या सुरक्षेपासून तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत कार्तिक कायम तिच्या पाठीशी उभा राहतो.

रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भाऊ-बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीची आठवण करून देणारा दिवस आहे. बॉलिवूडमधील या भावंडांचे नातेही त्याच प्रेमाची आणि जबाबदारीची सुंदर झलक दाखवते.

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

Web Title: Rakshabandhan 2026 arjun kapoor salman khan bollywood stars sisters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News
  • Raksha Bandhan 2026

संबंधित बातम्या

Rakshabandhan: व्हिडिओ कॉलवर औक्षण अन् UPI वर ‘राखीचं गिफ्ट’; भावंडांचा डिजिटल रक्षाबंधनाचा नवा ट्रेंड
1

Rakshabandhan: व्हिडिओ कॉलवर औक्षण अन् UPI वर ‘राखीचं गिफ्ट’; भावंडांचा डिजिटल रक्षाबंधनाचा नवा ट्रेंड

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र
2

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’; उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी प्रथमच एकत्र

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण
3

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

Raksha Bandhan Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? 28 ऑगस्टला बँकेत जाण्यापूर्वी पाहा RBI चा नियम
4

Raksha Bandhan Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? 28 ऑगस्टला बँकेत जाण्यापूर्वी पाहा RBI चा नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.