Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत

Ramayana Movie New Poster : ‘रामायणम्’चे नवे पोस्टर्स प्रदर्शित! अरुण गोविल राजा दशरथ, तर रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार. पिता-पुत्राच्या भावनिक नात्याची खास झलक पाहा.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2026 | 09:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘रामायणम्’चे नवे पोस्टर्स प्रदर्शित
  • राजा दशरथ आणि भगवान रामाच्या नात्याची भावनिक झलक
  • ‘रामायणम्’मध्ये कोणते कलाकार साकारणार महत्त्वाच्या भूमिका?
Ramayana Movie New Poster : बहुप्रतीक्षित ‘रामायणम्’ चित्रपटाची प्रेक्षकांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता राजा दशरथाच्या भूमिकेतील अरुण गोविल आणि भगवान रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूर यांची नवी पोस्टर्स प्रदर्शित केली आहेत. या पोस्टर्समधून राम आणि दशरथ यांच्यातील भावनिक नात्याची हृदयस्पर्शी झलक पाहायला मिळत आहे.

नमित मल्होत्रा यांच्या निर्मितीतील या भव्य चित्रपटातून महाकाव्याच्या विश्वाची आणि त्यातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख टप्प्याटप्प्याने करून दिली जात आहे. यापूर्वी अभिनेत्री लारा दत्ता यांच्या राणी कैकेयी आणि शीबा चड्ढा यांच्या मंथरा या व्यक्तिरेखांची पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली होती. आता राजा दशरथ आणि भगवान राम यांच्या पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

वचन आणि कर्तव्याच्या बंधनात अडकलेले पिता-पुत्र!

निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये राजा दशरथ रामाला आशीर्वाद देताना दिसत आहेत. राम त्यांच्या समोर गुडघे टेकून बसले आहेत. पिता-पुत्रामधील जिव्हाळा आणि प्रेम दाखवणारा हा क्षण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींची आठवण करून देतो. या प्रसंगातून नात्यातील आपुलकीसोबतच वचन आणि कर्तव्याचे महत्त्वही अधोरेखित होते.

दुसऱ्या पोस्टरमध्ये भगवान राम नदीच्या पाण्यात उभे राहून अस्थी विसर्जनाचा विधी पार पाडताना दिसत आहेत. हिरव्यागार निसर्गाच्या पार्श्वभूमीवर साकारलेला हा प्रसंग अत्यंत गंभीर आणि भावनिक आहे. रामाच्या आयुष्यातील वेदनादायी क्षणाची झलक या पोस्टरमधून पाहायला मिळते.

ही पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करताना निर्मात्यांनी भावनिक कॅप्शनही दिले आहे. “वचनाने बांधलेला पिता. कर्तव्याने बांधलेला पुत्र. या निरोपाचा क्षणच त्यांची शेवटची भेट ठरेल, याची दोघांनाही कल्पना नव्हती,” अशा शब्दांत त्यांनी या नात्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

‘रामायणम्’मध्ये कोणते कलाकार साकारणार महत्त्वाच्या भूमिका?

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘रामायणम्’मध्ये रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान, रवि दुबे लक्ष्मण आणि अरुण गोविल राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांच्या व्यक्तिरेखांमुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे.

या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने केली आहे. भव्य दृश्यांची निर्मिती आणि महाकाव्याचे मोठ्या पडद्यावरील सादरीकरण हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

Actor Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; कमेंट करत ‘या’ मराठी अभिनेत्याने दर्शवला पाठिंबा

दोन भागांत होणार ‘रामायणम्’ प्रदर्शित

‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भारताबाहेरील वितरणाची जबाबदारी सोनी पिक्चर्सकडे असून, हिंदी भाषिक बाजारपेठेत धर्मा प्रॉडक्शन्स वितरक म्हणून काम करणार आहे. हा भव्य चित्रपट जगभरातील IMAX चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे भारतीय महाकाव्याचा भव्य अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Exclusive: ‘वाईट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असली तरी…’, सुनील गोडसे साकारणार स्वामींच्या भूमिकेत जागर शक्तीचा

Web Title: Ramayana movie new poster ranbir kapoor arun govil ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Actor Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; कमेंट करत ‘या’ मराठी अभिनेत्याने दर्शवला पाठिंबा
1

Actor Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; कमेंट करत ‘या’ मराठी अभिनेत्याने दर्शवला पाठिंबा

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?
2

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
3

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
4

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.