Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; कमेंट करत ‘या’ मराठी अभिनेत्याने दर्शवला पाठिंबा

Actor Imran Khan Arrested: मुंबईतील CJP आंदोलनादरम्यान अभिनेता इम्रान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर मराठी अभिनेता चेतन वडनेरेने कमेंट करत पाठिंबा दर्शवला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2026 | 08:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पोलिसांच्या व्हॅनमधून इम्रान खानची पोस्ट व्हायरल
  • चेतन वडनेरेने कमेंट करत दर्शवला पाठिंबा
  • बॉलिवूडमधील कलाकारांचाही इम्रान खानला पाठिंबा
Actor Imran Khan Arrested:  मुंबईत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान पोलिसांनी ४०० हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याचाही समावेश आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानासह शहरातील विविध ठिकाणी झालेल्या निदर्शनांदरम्यान ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असताना इम्रान खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. त्याच्या या पोस्टवर मराठी अभिनेता चेतन वडनेरे याने कमेंट करत पाठिंबा दर्शवला आहे.

आंदोलनादरम्यान इम्रान खानसह ४०० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJPने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत निदर्शने करण्यात आली. शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी दक्षिण मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावरून सुमारे २०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये कार्यकर्ते तुषार गांधी यांच्या ‘हम भारत के लोग’ या संघटनेचे सदस्य आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थकांचा समावेश होता.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलक परवानगीशिवाय एकत्र जमले होते. अनधिकृत गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौकाजवळ CJPच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या पक्षाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करतात.

पोलिसांच्या व्हॅनमधून इम्रान खानची पोस्ट व्हायरल

या आंदोलनादरम्यान अभिनेता इम्रान खानला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. पोलिसांच्या व्हॅनमध्ये असताना त्याने स्वतःचा सेल्फी शेअर केला. या फोटोसोबत त्याने मिश्किल कॅप्शन लिहिले, ज्याचा अर्थ ‘असं दिसतंय की मी गाडी चालवायला निघालो आहे,’ असा होतो.

इम्रान खानच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्यानंतरही त्याने विनोदी शैलीत पोस्ट केल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Marathi Rangbhumi : मैत्री, विश्वास आणि सर्जनशीलतेचा संगम; मुक्ता-मीरा आणताहेत ‘पुन्हा नक्की भेटू’

चेतन वडनेरेने कमेंट करत दर्शवला पाठिंबा

इम्रान खानच्या या पोस्टवर मराठी अभिनेता चेतन वडनेरे याने कमेंट केली आहे. त्याच्या कमेंटमुळेही या पोस्टकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. चेतन वडनेरे आणि त्याची पत्नी, अभिनेत्री ऋतुजा धारप हे आंदोलन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे सांगितले जाते.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांशी गैरवर्तन होत असल्याचे किंवा एखादी बाब खटकत असल्याचे वाटल्यास हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळे इम्रान खानच्या पोस्टवरील चेतन वडनेरेच्या प्रतिक्रियेचीही चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूडमधील कलाकारांचाही इम्रान खानला पाठिंबा

इम्रान खानच्या पोस्टवर बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी आणि अभिनेत्री रुहानिका यांच्यासह अनेकांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दर्शवल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि कलाकारांच्या सोशल मीडिया प्रतिक्रियांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Sai Tamhankar and Lalit Prabhakar: सई-ललितची जोडी पुन्हा जमणार? दोघांच्या रॉयल लूकने सोशल मीडियावर वाढवली उत्सुकता

Web Title: Actor imran khan arrested viral post actor chetan vadnere support ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • entertainment
  • Imran khan

संबंधित बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
1

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

CJP Protest LIVE Updates: सीजेपी नेत्यांच्या अटकेनेंतर आंदोलनाचे नेतृत्तव अजिंक्य शिंदेंकडे
2

CJP Protest LIVE Updates: सीजेपी नेत्यांच्या अटकेनेंतर आंदोलनाचे नेतृत्तव अजिंक्य शिंदेंकडे

राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद; CJP च्या आंदोलनाला बसणार फटका?
3

राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद; CJP च्या आंदोलनाला बसणार फटका?

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
4

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.