Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Ramayana Set Fire: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या ‘रामायण’च्या सेटवर मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग लागली. आगीत सेट आणि शूटिंगच्या साहित्याचं नुकसान झालं, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2026 | 10:54 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Set Fire: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, या चित्रपटाच्या सेटवर आग लागल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे. सोमवारी मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटीमधील एका तात्पुरत्या शूटिंग सेटवर आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं.

फिल्म सिटीतील तात्पुरत्या सेटवर लागली आग

५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून २ मिनिटांनी गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. रिलायन्स मीडिया वर्क्स आणि प्राईम फोकस स्टुडिओच्या मागील बाजूस असलेल्या तात्पुरत्या सेटवर ही आग लागली.

बीएमसीच्या मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, प्राईम फोकस स्टुडिओच्या मागे सुमारे १०० बाय २० फूट आकाराच्या तात्पुरत्या सेटवर उभारलेल्या पीसीआर युनिटमध्ये आग लागली होती. आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यामध्ये सेटमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत.

इलेक्ट्रिकल वायरिंगसह अनेक साहित्याचं नुकसान

प्राथमिक माहितीनुसार, आग इलेक्ट्रिकल वायरिंग, इन्स्टॉलेशन आणि केबल्सपर्यंत पोहोचली. याशिवाय दरवाजे, लाकडी फळ्या, एसी युनिट्स, बांबू, प्लास्टिकचं साहित्य, साऊंड सिस्टीम आणि शूटिंगच्या उपकरणांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे.

मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी वॉर्ड कंट्रोल आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचं समोर आलेलं नाही.

रणबीर कपूर की ‘रामायणम्’ के सेट पर लगी आग, गोरेगांव फिल्मसिटी में अफरा-तफरी। ‘पति पत्नी और पंगा 2’ और ‘हसल 5’ के सेट तक फैली लपटें
#Ramayana #Fire #PatiPatniAurPanga2 https://t.co/RWdEycfeMG
— NBT Entertainment (@NBTEnt) October 5, 2026

 

‘रामायण’सोबत इतर मालिकांच्या सेटवरही परिणाम

या आगीचा परिणाम केवळ ‘रामायण’च्या सेटपुरता मर्यादित नसल्याची माहिती आहे. एमटीव्हीच्या ‘हसल ५’ आणि ‘पती, पत्नी और पंगा २’ या कार्यक्रमांचं चित्रीकरणही जवळच्या स्टुडिओमध्ये सुरू होतं.

प्राथमिक अहवालानुसार, आग सर्वप्रथम ‘पती, पत्नी और पंगा २’च्या सेटवर लागली आणि त्यानंतर ‘हसल ५’च्या सेटपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या दोन्ही सेटचं नेमकं किती नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आग लागल्यानंतरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. यामध्ये सेटमधून धूर निघताना आणि आगीच्या ज्वाला दिसत आहेत. या घटनेनंतर ‘रामायण’च्या सेटच्या सुरक्षेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ हा नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चित्रपटाच्या भव्य सेट्स आणि निर्मितीमुळे हा प्रोजेक्ट आधीपासूनच चर्चेत आहे. अशातच सेटवर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

Web Title: Ramayana set fire ranbir kapoor sai pallavi film city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • entertainment
  • Fire
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा
1

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार
3

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
4

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.