Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranbir Kapoor Love and War movie: हातावर जखमा, डोळ्यांवर गॉगल अन् जबरदस्त स्वॅग; लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत

Ranbir Kapoor Love and War movie: संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मधील रणबीर कपूरचा फर्स्ट लुक समोर आला आहे. रणबीरचा अनोखा अवतार आणि BGM चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2026 | 12:57 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रणबीरचा असा अवतार याआधी कधी पाहिला नसेल
  • ‘लव्ह अँड वॉर’मधील रणबीरचा लूक चर्चेत
  • पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली
Ranbir Kapoor Love and War movie:  संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तीन आघाडीचे कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबाबत मोठी उत्सुकता आहे. आता या उत्सुकतेत आणखी भर पडली आहे. निर्मात्यांनी रणबीर कपूरचा फर्स्ट लुक पोस्टर प्रेक्षकांसमोर आणला आहे.

रणबीर कपूरचा अनोखा अवतार चर्चेत

‘लव्ह अँड वॉर’च्या फर्स्ट लुकमध्ये रणबीर कपूर एका वेगळ्याच अवतारात दिसत आहेत. यापूर्वी त्यांना अशा लूकमध्ये पाहिलेलं नाही. पोस्टरमध्ये रणबीरचा अंदाज पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांप्रमाणेच या पोस्टरमध्येही भव्यता आणि बारकाव्यांवर दिलेला विशेष भर पाहायला मिळतो. रणबीरचा लूक, पोस्टरची मांडणी आणि त्यासोबत ऐकू येणारं BGM यामुळे फर्स्ट लुक लक्षवेधी ठरला आहे.

फर्स्ट लुकसोबत BGMचीही चर्चा

रणबीर कपूरच्या लूकसोबतच पोस्टरमध्ये ऐकायला मिळणारं BGM देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाचा माहोल आणि रणबीरच्या व्यक्तिरेखेची झलक या संगीतामुळे अधिक प्रभावीपणे समोर येते.

रणबीर कपूरला याआधी अशा रूपात न पाहिल्याने त्याची व्यक्तिरेखा नेमकी कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

रणबीर-आलिया-विकी पहिल्यांदाच एका चित्रपटात

‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या तिन्ही कलाकारांची एकत्रित स्क्रीन प्रेझेन्स हा चित्रपटाचा महत्त्वाचा आकर्षणाचा भाग आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनामुळेही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रत्येक नवीन पोस्टर, लूक किंवा अपडेटकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर

२१ जानेवारी २०२७ रोजी होणार रिलीज

‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रणबीर कपूरचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर आता आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या व्यक्तिरेखांचे लूक कधी समोर येतात, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Web Title: Ranbir kapoor love and war movie first look sanjay leela bhansali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
1

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर
2

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
3

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री
4

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.