Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranbir Kapoor Ramayana: ‘रामायण’ भारतात वेगळी, चीनमध्ये वेगळी! रणबीर कपूरच्या सिनेमात ३३ मिनिटांचा फरक, जाणून घ्या कारण

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची भारत आणि चीनमध्ये वेगवेगळी आवृत्ती रिलीज होण्याची चर्चा आहे. चीनमधील व्हर्जन भारतापेक्षा ३३ मिनिटांनी छोटी असणार असल्याचं वृत्त आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 16, 2026 | 11:22 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’ हा सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रोजेक्टपैकी एक मानला जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘रामायण’ जगभरात एकाच आवृत्तीत प्रदर्शित होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात प्रदर्शित होणाऱ्या आवृत्तीपेक्षा चीनमध्ये रिलीज होणारी ‘रामायण’ची आवृत्ती जवळपास ३३ मिनिटांनी छोटी असू शकते. परदेशी प्रेक्षकांना लक्षात घेऊन निर्मात्यांनी चित्रपटाच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.

चीनमधील आवृत्ती ३३ मिनिटांनी छोटी का?

‘मिड-डे’च्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी प्रेक्षकांसाठी तयार करण्यात येणारी आवृत्ती भारतीय आवृत्तीपेक्षा सुमारे ३३ मिनिटांनी छोटी असेल. यामागचा उद्देश चित्रपटाचा वेग अधिक ठेवणे आणि परदेशी प्रेक्षकांना कथा सहज समजावी हा असल्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय प्रेक्षकांसाठी मात्र ‘रामायण’ ही केवळ एक कथा नाही, तर श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे भारतात प्रदर्शित होणाऱ्या आवृत्तीत कथा, भावना, भक्ती आणि सांस्कृतिक संदर्भांना अधिक महत्त्व दिलं जाणार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

चीनमध्ये ‘रामायण: द लीजेंड ऑफ द प्रिन्स’ नावाने होणार रिलीज?

रिपोर्टनुसार, चीनमध्ये हा चित्रपट ‘रामायण: द लीजेंड ऑफ द प्रिन्स’ या नावाने प्रदर्शित केला जाऊ शकतो. निर्मात्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून चीनमध्ये भारतीय सिनेमांची लोकप्रियता पुन्हा वाढवण्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं जात आहे.

यापूर्वी आमिर खानच्या ‘पीके’, ‘दंगल’, ‘सीक्रेट सुपरस्टार’ आणि ‘अंधाधुन’ यांसारख्या भारतीय चित्रपटांना चीनमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘रामायण’च्या माध्यमातून भारतीय चित्रपटांसाठी चीनमधील बाजारपेठ पुन्हा खुली करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे.

Puja Banerjee Baby: ‘देवों के देव… महादेव’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा झाली आई; लेकीची पहिली झलक केली शेअर

परदेशी प्रेक्षकांसाठी अॅक्शन आणि VFXवर भर

परदेशातील अनेक प्रेक्षकांसाठी रामायणाची कथा तुलनेने नवीन असू शकते. त्यामुळे परदेशी आवृत्तीत अॅक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) यावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.

या आवृत्तीला एक भव्य अॅक्शन-फँटसी चित्रपट म्हणून सादर करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. चांगल्याचा वाईटावर विजय ही कथा जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करू शकते, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.

Box Office: इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत ५५.७५ कोटींची कमाई, ‘बटवारा १९४७’ला टाकलं मागे

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश मुख्य भूमिकेत

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या भव्य प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यश रावणाची भूमिका साकारत असून, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाचं बजेट तब्बल ४,००० कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. ‘रामायण’च्या माध्यमातून भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. आता हा भव्य चित्रपट भारतासह आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Ranbir kapoor ramayana india china different versions 33 minute difference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
1

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..
2

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?
3

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
4

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.