Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuka Mhane Kahe Kabira: संत तुकाराम आणि संत कबीरांच्या विचारांचा सुरेल संगम; २२ नोव्हेंबरला मुंबईत रंगणार भक्तिसंगीताचा कार्यक्रम

Tuka Mhane Kahe Kabira: पंचम निषाद प्रस्तुत ‘तुका म्हणे कहे कबीरा’ हा भक्तिसंगीताचा विशेष कार्यक्रम २२ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे. पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि भुवनेश कोमकली सादर करणार संतांच्या रचना.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2026 | 04:08 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tuka Mhane Kahe Kabira: संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या कालातीत विचारांचा, भक्तीचा आणि अध्यात्माचा सुरेल अनुभव रसिकांना घेता येणार आहे. पंचम निषाद प्रस्तुत ‘तुका म्हणे कहे कबीरा’ हा विशेष भक्तिसंगीताचा कार्यक्रम २२ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भारतातील दोन आघाडीचे शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि भुवनेश कोमकली एकाच मंचावरून संतांच्या रचना सादर करणार आहेत.

तुकारामांच्या अभंगांचा आणि कबीरांच्या दोह्यांचा संगीतमय संवाद

संत तुकाराम आणि संत कबीर वेगवेगळ्या प्रदेशांतले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि वेगवेगळ्या परंपरांशी जोडलेले होते. मात्र, त्यांच्या विचारांमध्ये आध्यात्मिक एकता दिसून येते. संत तुकाराम विठोबाच्या सगुण रूपाची भक्ती करत होते, तर संत कबीर निर्गुण आणि निराकार परमेश्वराचे चिंतन करत होते.

तुकारामांच्या अभंगांमधून विठोबाचे रूप, भक्ती आणि दैनंदिन जीवनातील तत्त्वज्ञान उलगडते. तर कबीरांच्या दोह्यांमधून जीवनातील कठोर सत्य साध्या आणि थेट शब्दांत मांडले जाते. दोघांनीही आपल्या सामान्य व्यवसायातून ईश्वराचा शोध घेतला. याच दोन संतांच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा सुरेल संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.

पंडित जयतीर्थ मेवुंडी आणि भुवनेश कोमकली यांचे सादरीकरण

या कार्यक्रमात किराणा घराण्याची परंपरा पुढे नेणारे पंडित जयतीर्थ मेवुंडी तुकारामांचे अभंग सादर करणार आहेत. भावपूर्ण अभंगगायन आणि भक्तिगीतांच्या सादरीकरणासाठी ते ओळखले जातात. तर पंडित कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली कबीरांच्या रचना आपल्या चिंतनशील शैलीतून सादर करणार आहेत.

यावेळी पंडित जयतीर्थ मेवुंडी म्हणाले, “संत तुकारामांचे अभंग केवळ भक्तिगीते नाहीत, ती जीवनाचीच प्रतिबिंबे आहेत. प्रत्येक ओळीत सामान्य माणसाचा संघर्ष आणि विठोबाला शरण जाण्याची ओढ आहे. ते गाताना देवाशी संवाद साधल्यासारखे वाटते.”

भुवनेश कोमकली म्हणाले, “कबीरांची वाणी आपल्याला सत्याला सामोरे जाण्यास भाग पाडते. त्यांचे शब्द धारदार, निर्भय आणि मुक्त करणारे आहेत. अशा व्यासपीठावर कबीरवाणी सादर करणे ही जबाबदारी आहे आणि तितकाच आनंदही.”

Harshvardhan Rane: हर्षवर्धन राणेला मिळाली कोट्यवधींची Defender Octa SUV! ‘सनम तेरी कसम’च्या निर्मात्याने दिलं खास गिफ्ट

डॉ. धनश्री लेले करणार निवेदन

कार्यक्रमाला डॉ. धनश्री लेले यांच्या निवेदनाचीही साथ लाभणार आहे. त्या मराठी आणि हिंदी भाषेतून संत तुकारामांच्या अभंगांचा आणि संत कबीरांच्या दोह्यांचा तात्त्विक अर्थ उलगडून सांगणार आहेत. त्यांना मंदार पुराणिक (तबला), सुधांशू घारपुरे (हार्मोनियम), सम्यक पराशरी (बासरी), सुखद मुंडे (पखवाज) आणि अपूर्व द्रविड (अतिरिक्त ताल) यांची साथ लाभणार आहे.

पंचम निषादचे संस्थापक आणि दिग्दर्शक शशी व्यास म्हणाले, “भाषा, भूगोल आणि भक्तिपरंपरा वेगळ्या असल्या, तरी कबीर आणि तुकारामांचा मूळ संदेश एकच आहे, तो म्हणजे सत्याचा शोध. ‘तुका म्हणे कहे कबीरा’च्या माध्यमातून त्यांचे स्वर एकाच संगीतमय संवादात गुंफण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

पंचम निषाद प्रस्तुत ‘तुका म्हणे कहे कबीरा’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा (पश्चिम) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मध्यंतर नसणार आहे. संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या विचारांचा संगीताच्या माध्यमातून अनुभव घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Web Title: Tuka mhane kahe kabira bhakti sangeet program mumbai jayateerth mevundi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Tabu New Web Series: तब्बूची पहिल्यांदाच हिंदी वेब सीरिजमध्ये एन्ट्री, ‘टनल मेन’मधून उलगडणार उत्तराखंड बचावकार्याची कहाणी
1

Tabu New Web Series: तब्बूची पहिल्यांदाच हिंदी वेब सीरिजमध्ये एन्ट्री, ‘टनल मेन’मधून उलगडणार उत्तराखंड बचावकार्याची कहाणी

Harshvardhan Rane: हर्षवर्धन राणेला मिळाली कोट्यवधींची Defender Octa SUV! ‘सनम तेरी कसम’च्या निर्मात्याने दिलं खास गिफ्ट
2

Harshvardhan Rane: हर्षवर्धन राणेला मिळाली कोट्यवधींची Defender Octa SUV! ‘सनम तेरी कसम’च्या निर्मात्याने दिलं खास गिफ्ट

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर
3

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
4

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.