
रणवीर सिंहच्या प्रवक्त्याने दिले स्पष्टीकरण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रणवीर सिंहचे निवेदन
‘डॉन ३’ चित्रपटाभोवतीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, चित्रपटसृष्टीत बंदी घातल्याच्या वृत्तांबाबत अभिनेता रणवीर सिंहने आता एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, रणवीर सिंगला चित्रपटसृष्टी आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाबद्दल अत्यंत आदर आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘डॉन ३’ बाबतच्या अलीकडील घडामोडींदरम्यान रणवीर सिंगने जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे, कारण त्याचा विश्वास आहे की व्यावसायिक बाबी आणि वैयक्तिक संबंध सन्मान, सामंजस्य आणि परस्पर आदराने हाताळले पाहिजेत. प्रवक्त्याने पुढे सांगितले की, अलीकडच्या काळात विविध अफवा आणि अटकळी समोर आल्या असल्या तरी, रणवीर सिंगला सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देणे कधीही आवश्यक वाटले नाही. तो पूर्णपणे त्याच्या कामावर आणि आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे.
रणवीर सिंहवर खरंच बंदी घातली आहे का?
माध्यमांच्या वृत्तानुसार, चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच रणवीर सिंगने ‘डॉन ३’ पासून स्वतःला दूर केले होते. चित्रपटाच्या तयारीवर आधीच कोट्यवधी रुपये खर्च झाले होते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने त्याला एकापाठोपाठ एक तीन स्मरणपत्रे पाठवली, परंतु अभिनेत्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फरहान अख्तरने चित्रपटाच्या पूर्व-चित्रण आणि तयारीवर अंदाजे ४५ कोटी रुपये खर्च केले होते, परंतु रणवीर सिंगने अद्याप ते पैसे परत केलेले नाहीत. यामुळेच एफडब्ल्यूआयसीईने (FWICE) रणवीर सिंगविरोधात असहकाराची नोटीस बजावली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही कारवाई केवळ रणवीरसाठीच नव्हे, तर इंडस्ट्रीतील सर्व प्रमुख कलाकारांना एक संदेश देण्यासाठी करण्यात आली आहे. दरम्यान रणवीरने आपण केवळ सन्मान करतो याव्यतिरिक्त कोणतेही विधान याबाबत केलेले नाही. फरहान अख्तरकडूनही कोणतेही विधान समोर आलेली नाही.
Don 3 Movie: रणवीर सिंग नंतर फरहान अख्तर स्वतः साकारणार‘डॉन’ची भूमिका? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर