Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी

Marathi Theatre: मराठी रंगभूमीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबईतील नेहरू सेंटरने विशेष उपक्रम सुरू केला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुढाकाराने आता दर रविवारी दुपारी ३.३० वाजता नेहरू सेंटरमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2026 | 06:55 PM
मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये 'ही दोस्ती तुटायची नाही'पासून नाटकांची मेजवानी

मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये 'ही दोस्ती तुटायची नाही'पासून नाटकांची मेजवानी

Follow Us
Follow Us:
  • मराठी रंगभूमीला मिळणार नवे व्यासपीठ
  • मराठी नाटकांची तिसरी घंटा आता नेहरू सेंटरमध्ये!
  • नाट्यनिर्मात्यांना मिळणार सवलतीच्या दरात नाट्यगृह
Marathi Theatre: मराठी रंगभूमीला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित नेहरू सेंटरने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. आता नेहरू सेंटरमध्ये दर रविवारी मराठी नाटकांचे प्रयोग रंगणार असून, व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांना येथे सादरीकरणाची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, मराठी नाट्यनिर्मात्यांना रविवारच्या प्रयोगांसाठी नेहरू सेंटरचे नाट्यगृह सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.(Marathi Theatre)

या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला मुंबईतील एका प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्रात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच मराठी नाटकांचा प्रेक्षकवर्ग वाढवणे आणि नव्या प्रेक्षकांना मराठी रंगभूमीकडे आकर्षित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार

मराठी नाटकांसाठी नेहरू सेंटरचे दरवाजे खुले

नेहरू सेंटरमध्ये आजवर मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग सादर झाले आहेत. हिंदी आणि गुजराती नाटकांचे प्रयोगही येथे नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र, मराठी नाटकांनाही या प्रतिष्ठित व्यासपीठावर अधिकाधिक संधी मिळावी, अशी नेहरू सेंटर व्यवस्थापनाची इच्छा होती. त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला पुढाकार घेण्याची विनंती करण्यात आली.

नेहरू सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीर यांनी सांगितले की, नेहरू सेंटर हे केवळ नाट्यप्रयोगांसाठी उपलब्ध असलेले ठिकाण न राहता एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे, असा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. देशभरात उत्तम काम करणाऱ्या नाट्यसंस्था, कलाकार आणि नाट्यनिर्मात्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना येथे सादरीकरणाची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

दर रविवारी दुपारी ३.३० वाजता नाट्यप्रयोग

या उपक्रमाची सुरुवात दर रविवारी दुपारी ३.३० वाजता मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यापासून होणार आहे. सुरुवातीला रविवारच्या प्रयोगांवर भर दिला जाणार आहे. या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात आठवड्यातील इतर दिवशीही मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करण्याचा विचार आहे.

या उपक्रमांतर्गत ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे. आगामी काळात ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’, ‘भूमिका’, ‘जर तरची गोष्ट’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘आमने सामने’ आणि ‘मराठी बाणा’ यांसारखी नाटके नेहरू सेंटरमध्ये सादर होणार आहेत.

नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नाट्यगृह

मराठी नाट्यनिर्मात्यांसाठी रविवार हा महत्त्वाचा दिवस असतो. मात्र, या दिवशी नाट्यगृह उपलब्ध होणे अनेकदा कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन नेहरू सेंटर व्यवस्थापनाने मराठी नाट्यनिर्मात्यांना सवलतीच्या दरात नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमात केवळ लोकप्रिय व्यावसायिक नाटकांनाच नव्हे, तर आशयघन आणि वेगळे प्रयोग करणाऱ्या प्रायोगिक नाटकांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. मराठी नाट्यविश्वातील विविध संस्था, कलाकार आणि निर्माते यांना एकत्र आणून त्यांच्या कलाकृती अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पार पाडणार आहे.

मराठी रंगभूमीला प्रतिष्ठित व्यासपीठ मिळणार : अजित भुरे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. कलाकार आणि नाट्यनिर्माते म्हणून नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळणे किती महत्त्वाचे असते, याची आपल्याला जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

नेहरू सेंटरसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मराठी नाटकांना संधी मिळणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मराठी नाटकांच्या प्रयोगांना मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे मराठी रंगभूमीने या संधीचे स्वागत करून दर्जेदार नाट्यप्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असे मत अजित भुरे यांनी व्यक्त केले.

नाट्यवाचन, कार्यशाळा आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन

या उपक्रमाचे स्वरूप केवळ नाट्यप्रयोगांपुरते मर्यादित राहणार नाही. ‘आविष्कार’ संस्थेच्या सहकार्याने नाट्यवाचन, कार्यशाळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच इतर भारतीय भाषांमधील नाटकांनाही या व्यासपीठावर संधी देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नाट्यगृह उपलब्ध करून देण्यापलीकडे जाऊन नाट्यनिर्मिती, नाट्यसंस्था आणि कलाकारांना आवश्यक सहकार्य करण्याची नेहरू सेंटर व्यवस्थापनाची तयारी आहे. एनसीपीएच्या धर्तीवर नाट्यनिर्मिती क्षेत्रातही पुढाकार घेण्याचा विचार आहे. यासाठी विविध नाट्यप्रयोग, महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ

मराठी रंगभूमीला नवे व्यासपीठ, नाट्यनिर्मात्यांना प्रयोगांसाठी अनुकूल संधी आणि प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देण्याच्या दिशेने नेहरू सेंटरने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि नाट्यसंस्थांचे सहकार्य मिळाल्यास या उपक्रमाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेहरू सेंटरमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग कधी आयोजित केले जाणार आहेत?

    Ans: सुरुवातीला दर रविवारी दुपारी ३.३० वाजता मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित केले जाणार आहेत.

  • Que: नेहरू सेंटरमध्ये कोणत्या प्रकारच्या मराठी नाटकांना संधी मिळणार आहे?

    Ans: व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही प्रकारच्या मराठी नाटकांना या उपक्रमांतर्गत सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

  • Que: नेहरू सेंटरच्या या उपक्रमासाठी कोणती संस्था पुढाकार घेत आहे?

    Ans: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या उपक्रमासाठी पुढाकार घेत असून, नेहरू सेंटर व्यवस्थापनाच्या सहकार्याने मराठी नाटकांना अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: Marathi theatre plays nehru centre mumbai akil bharatiya marathi natya parishad sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • entertainment
  • Mumbai

संबंधित बातम्या

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
1

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार
2

Malavika Mohanan: फक्त कलाकारच नाही, तर पडद्यामागील टीमही महत्त्वाची! मालविका मोहननचा ‘पॉकेट नोवेल’साठी खास पुढाकार

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ
3

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!
4

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.