Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samay Raina: समय रैना पुन्हा अडचणीत! ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील बिहारी-कश्मीरी कमेंटवरून सोशल मीडियावर संताप

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या नव्या एपिसोडमधील बिहार आणि काश्मीरवरील वक्तव्यांमुळे समय रैना आणि शेरॉन शर्मा वादात सापडले. राजकीय नेत्यांनीही टीका केली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 09:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Samay Raina:  कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा त्याच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोच्या अलीकडील एपिसोडमध्ये बिहार आणि काश्मीरमधील लोकांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या एपिसोडमधील काही संवादांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका वाद काय?

‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या अलीकडील एपिसोडमध्ये पॅनेलिस्ट म्हणून शेरॉन शर्मा सहभागी झाल्या होत्या. शोदरम्यान समय रैना आणि शेरॉन शर्मा यांच्यात झालेल्या संवादात दोघांनीही एकमेकांच्या प्रादेशिक पार्श्वभूमीचा संदर्भ देत विनोद केला.

समय रैनाने शेरॉनच्या बिहारी पार्श्वभूमीवर टिप्पणी केली. त्यानंतर शेरॉननेही समयच्या काश्मिरी पार्श्वभूमीचा संदर्भ देत त्याला प्रत्युत्तर दिले.

समय रैनाने काय म्हटलं?

शोदरम्यान समय रैना शेरॉनला उद्देशून म्हणतो की, “शेरॉन इतकी बिहारी आहे की तिला ‘इबोला’चा अर्थ कोणीतरी काही बोललं, म्हणजे ‘बोला’ असा वाटतो.”

समयच्या या विनोदावर शेरॉननेही त्याला प्रत्युत्तर दिले.

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

शेरॉन शर्माने काय उत्तर दिलं?

शेरॉनने समय रैनाच्या काश्मिरी पार्श्वभूमीचा संदर्भ देत म्हटले, “समय इतका कश्मीरी आहे की त्याला ‘स्टोन’ आवडतो.”

यानंतर दोघांमधील हा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

‘बिहारी मुंबईत नोकरीसाठी येतात’ या वक्तव्यावरही वाद

यानंतर समय रैनाने शेरॉनच्या बिहारमधून मुंबईत नोकरीच्या शोधात येण्याचा उल्लेख करत पुन्हा विनोद केला. समयच्या या वक्तव्यावर शेरॉनने उत्तर देताना म्हटले, “कमीत कमी मी माझं राज्य माझ्या मर्जीने सोडलं आहे.”

या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

या वक्तव्यांनंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लॅटेंट’वर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

या वादात आता राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, शिवसेना नेते आनंद दुबे यांनी समय रैना आणि त्याच्या शोवर टीका केली. बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनीही नागरिक आणि समुदायांबाबत करण्यात आलेल्या अपमानजनक वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. समय रैना आणि शेरॉन शर्मा यांच्यातील संवाद आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले असून, अशा प्रकारच्या टिप्पण्या सहन केल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या वादात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, शिवसेना नेते आनंद दुबे यांनी समय रैना आणि त्याच्या शोवर टीका केली आहे.

बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनीही नागरिक आणि समुदायांबाबत करण्यात आलेल्या अपमानजनक वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. समय रैना आणि शेरॉन शर्मा यांच्यातील संवाद आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले असून, अशा प्रकारच्या टिप्पण्या सहन केल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम

हरीश रावत काय म्हणाले?

काँग्रेस नेते हरीश रावत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कॉमेडियन्सनी एखाद्या समुदायावर किंवा प्रदेशावर विनोद करताना अधिक संवेदनशीलता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

‘इंडियाज गॉट लॅटेंट’ पुन्हा चर्चेत

दरम्यान, ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोभोवती वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शोमधील काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता बिहार आणि काश्मीरवरील वक्तव्यांमुळे समय रैना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

या प्रकरणावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या वादाला आणखी कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Samay raina indias got latent bihar kashmir controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Samay Raina

संबंधित बातम्या

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम
1

‘Toxic’ Box Office Collections Day 4: नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही ‘टॉक्सिक’ची घोडदौड; चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
2

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?
3

Orry and Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये ओरीचा राडा? भर कार्यक्रमात दिली धमकी, नेमकं काय घडलं?

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क
4

‘फुलों का तारों का’ रक्षाबंधनासाठी लिहिलंच नव्हतं; ५५ वर्षांपूर्वी लता मंगेशकरांनी जे केलं, ते पाहून पंचम दाही झाले होते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.