Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kranti Redkar Mother: ‘मैत्रेया’च्या शूटिंगआधीच आईला कर्करोगाचं निदान; क्रांती रेडकर भावुक, सांगितला संघर्षाचा काळ

Kranti Redkar Mother: अभिनेत्री क्रांती रेडकरच्या आईला ‘मैत्रेया’ चित्रपटाच्या शूटिंगच्या एक दिवस आधी कर्करोगाचं निदान झालं होतं. आता आई कर्करोगमुक्त झाली असून, अपघातामुळे प्रीमियरला उपस्थित राहता न आल्याची खंत क्रांतीने व्यक्त केली.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 20, 2026 | 03:24 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kranti Redkar Mother: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या ‘मैत्रेया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच तिच्या कुटुंबावर मोठं संकट ओढावलं होतं. चित्रपटाचं काम सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी क्रांतीच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे गेल्या काही काळापासून क्रांती आईसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नव्हती. मात्र, आता तिच्या आईने कर्करोगावर मात केली असून, ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच आईचं एक स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंतही तिने व्यक्त केली आहे.

‘माझ्याकडे आई आहे, माझी सुखाची व्याख्या’

‘मैत्रेया’ चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्याला जाण्यापूर्वी क्रांतीने आईसोबतचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला तिने ‘माझ्याकडे आई आहे. माझी सुखाची व्याख्या’ असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडिओमध्ये तिने आईच्या आजारपणाबद्दल खुलासा केला.

क्रांती म्हणाली, “मैत्रेयासाठी मी ज्या दिवशी काम सुरू केलं, त्याच्या एक दिवस आधी माझ्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. तुम्ही मला सारखं विचारायचात की आता आईसोबतचे व्हिडिओ का पोस्ट करत नाहीस? कारण त्यावेळी आमची मॅडम कर्करोगाशी झुंज देत होती. पण ही खूप आनंदाची गोष्ट आहे की ती आता कर्करोगमुक्त आहे.”

आईचं ‘मैत्रेया’च्या प्रीमियरला उपस्थित राहण्याचं स्वप्न अपूर्ण

आईने कर्करोगावर मात केल्यानंतर कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र, त्यानंतर आणखी एक संकट आलं. ‘मैत्रेया’च्या म्युझिक प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी क्रांतीची आई आली होती. पण तिथे त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. त्यानंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाच्या मुख्य प्रीमियर सोहळ्याला आईला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत क्रांतीने व्यक्त केली.

यावर क्रांतीच्या आईनेही अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “अपूर्ण नाही राहिलं. माझ्या मनातून मी चित्रपट बघणार ना आणि आशीर्वादही देणार. एवढा सुंदर चित्रपट मी मिस करेन. मी इन्स्टाग्राम नेहमी बघते.” आईच्या या शब्दांनी हा व्हिडिओ अधिकच भावुक झाला आहे.

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!

आई-वडिलांनी केलं क्रांतीच्या मेहनतीचं कौतुक

क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या आई-वडिलांनी चित्रपटासाठी तिने घेतलेल्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्रीचे वडीलही ‘मैत्रेया’ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आई-वडिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, याची झलक या व्हिडिओतून दिसते.

२० नोव्हेंबरला ‘मैत्रेया’ चित्रपटगृहांत प्रदर्शित

समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित ‘मैत्रेया’ हा चित्रपट आज, २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आईच्या आजारपणापासून ते तिच्या कर्करोगमुक्त होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर अपघातामुळे प्रीमियरला उपस्थित राहता न येणं, अशा अनेक भावनिक प्रसंगांना क्रांतीला सामोरं जावं लागलं. तरीही आई-वडिलांचे आशीर्वाद आणि पाठिंबा तिच्यासाठी मोलाचा असल्याचं तिच्या पोस्टमधून स्पष्ट होतं.

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका

Web Title: Kranti redkar mother cancer diagnosis before maitreya shooting emotional story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Kranti Redkar Wankhede
  • marathi movie

संबंधित बातम्या

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!
1

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या घरी चिमुकल्याचं आगमन; ३९व्या वर्षी बनली आई, मुलाला दिलं खास धार्मिक नाव!

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या संयमामागे दडलीये मोठी लीला; मार्तंडच्या आव्हानाला कसं उत्तर देणार स्वामी?
2

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या संयमामागे दडलीये मोठी लीला; मार्तंडच्या आव्हानाला कसं उत्तर देणार स्वामी?

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका
3

Harshad Atkari: दोन वर्षांनंतर हर्षद अतकरीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेत साकारणार ‘ही’ हटके भूमिका

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!
4

Ramayana: ‘धुरंधर २’लाही टाकले मागे? रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी; १५ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.