दिवाळी 2026 (फोटो- गायत्री पवळे)
पूर्वी दिवाळीच्या सुट्यांमध्ये मुले मित्रमंडळींसोबत माती, दगड, विटा, लाकडी फळ्या आणि विविध साहित्य गोळा करून किल्ले तयार करीत असत. किल्ल्याचा बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वार, दरवाजे यांसह त्यावर मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मांडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मुले स्वतःच्या कल्पकतेने साकारत. आता बाजारात तयार किल्ल्यांचे अनेक आकार आणि प्रकार उपलब्ध असल्याने वेळेची बचत करण्यासाठी पालकांकडूनही त्यांची खरेदी केली जाते.
Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
मात्र, विविध मंडळे, सोसायट्या आणि सार्वजनिक संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या किल्ले बनविण्याच्या स्पर्धांमुळे मुलांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना मुलांना गड-किल्ल्यांचा इतिहास, त्यांची रचना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती मिळते. त्यामुळे केवळ सजावटीपुरता मर्यादित न राहता किल्लेनिर्मिती हा शिकण्याचा आणि सर्जनशीलतेला वाव देणारा उपक्रम ठरत आहे.
रेडिमेड किल्ल्यांची उपलब्धता आणि स्वतः किल्ले बनविण्याची परंपरा या दोन्ही गोष्टी दिवाळीत कायम आहेत. जागेची उपलब्धता, वेळ आणि मुलांची आवड यानुसार पालक पर्याय निवडत असले, तरी स्पर्धांमुळे पारंपरिक किल्लेनिर्मितीची संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
दिवाळीनिमित्त बाजारात रेडिमेड किल्ल्यांचे विविध आकार आणि प्रकार उपलब्ध झाले आहेत. साधारण ४०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत या किल्ल्यांच्या किमती आहेत. आकार, बांधणी, सजावट आणि त्यासोबत उपलब्ध असलेल्या मावळ्यांच्या मूर्ती यानुसार किमतीत फरक पडतो. कमी जागेत सहज बसविता येणाऱ्या छोट्या किल्ल्यांपासून ते मोठ्या आकाराच्या आकर्षक किल्ल्यांपर्यंत विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. वेळेची बचत आणि घरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन अनेक पालक रेडिमेड किल्ल्यांना पसंती देत आहेत.
Ans: पुण्यात रेडिमेड किल्ल्यांचे दर हे ४०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत आहेत.
Ans: वेळेची बचत आणि घरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन अनेक पालक रेडिमेड किल्ल्यांना पसंती देत आहेत.






