
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shreya Chaudhary: अभिनेत्री श्रेया चौधरी आता अभिनेता आयुष्मान खुरानासोबत मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘बंदिश बँडिट्स’च्या दोन्ही सीझनमधील अभिनय आणि अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील ‘द मेहता बॉईज’मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेली श्रेया आता ‘मुपापा’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘मुपापा’च्या माध्यमातून श्रेया चौधरीच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. आयुष्मान खुरानासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तिच्या आगामी प्रोजेक्टकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. थिएट्रिकल रिलीज असलेल्या या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर आपली वेगळी छाप पाडण्यास सज्ज आहे.
समीर सक्सेना यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट
‘मुपापा’चं दिग्दर्शन समीर सक्सेना यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी आणि पोशम पा पिक्चर्स यांनी केली आहे. समीर सक्सेना यांनी बिस्वपती सरकार, सौरभ खन्ना आणि अमित गोलानी यांच्यासोबत पोशम पा पिक्चर्सची सह-स्थापना केली आहे. या स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊसचं हे पहिलं थिएट्रिकल कोलॅबोरेशन आहे.
‘बंदिश बँडिट्स’ ते ‘द मेहता बॉईज’
श्रेया चौधरीने आपल्या आतापर्यंतच्या कामातून प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बंदिश बँडिट्स’च्या सीझन १ आणि २ मधील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. यानंतर ‘द मेहता बॉईज’मधील तिच्या भूमिकेतून तिच्या अभिनयातील वैविध्य आणि व्यक्तिरेखांमध्ये भावनिक खोली निर्माण करण्याची क्षमता पाहायला मिळाली.
नैसर्गिक अभिनय आणि रिलेटेबल व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रेयासाठी ‘मुपापा’ हा प्रोजेक्ट तिच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
YRF Talent ने श्रेयाला केलं साइन
दरम्यान, श्रेया चौधरीला YRF Talentने एक्सक्लुझिव्ह मॅनेजमेंटसाठी साइन केलं आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल प्रवासात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. आता ती यश राज फिल्म्सच्या टॅलेंट मॅनेजमेंट आर्म YRF Talentचा भाग झाली आहे.
YRF Talentच्या रोस्टरमध्ये राणी मुखर्जी, आयुष्मान खुराना, सोनम कपूर, वाणी कपूर, शर्वरी, अहान पांडे आणि अनीत पड्डा यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
YRF Talentकडून कलाकारांच्या केवळ वैयक्तिक प्रोजेक्ट्सवरच नव्हे, तर त्यांच्या दीर्घकालीन करिअरवरही लक्ष केंद्रित केलं जातं. कलाकारांसोबत जवळून काम करत त्यांच्या करिअरला दिशा देणे, ब्रँड आणि कमर्शियल संधी निर्माण करणे तसेच सिनेमा, एंडोर्समेंट्स, फॅशन आणि डिजिटल क्षेत्रात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ही टीम काम करते.
आता ‘मुपापा’मधून आयुष्मान खुरानासोबत श्रेया चौधरीची जोडी मोठ्या पडद्यावर कशी दिसते, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. १९ फेब्रुवारी २०२७ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.