Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?

Miranda Warning movie: ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटातील जान्हवी किल्लेकरचा रहस्यमय लूक समोर आला आहे. २७ नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या या सस्पेन्स-थ्रिलरमध्ये ती रंजक भूमिका साकारणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 11:13 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Miranda Warning movie:  मालिका आणि चित्रपटांमधील अभिनयातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता एका वेगळ्या आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी आगामी ‘मिरांडा वॉर्निंग’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटातील तिचा लूक समोर आला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

‘मिरांडा वॉर्निंग’च्या पोस्टरने वाढवलं गूढ

‘मिरांडा वॉर्निंग’च्या नव्या पोस्टरमध्ये जान्हवी किल्लेकरचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि नजर अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे चित्रपटातील तिची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

२७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जान्हवीच्या भूमिकेभोवती असलेलं गूढ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच उलगडणार आहे.

फार्महाऊसवरील खुनाच्या घटनेभोवती फिरणार कथा

‘मिरांडा वॉर्निंग’ची कथा हेरिटेजवाडी नावाच्या फार्महाऊसवर घडलेल्या खुनाच्या घटनेभोवती फिरते. या घटनेनंतर सुरू होणाऱ्या थरारक शोधात अनेक रहस्यं उलगडत जातील. या तपासादरम्यान नेमकं काय घडतं, हे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात दमदार कथानकासोबतच कसलेले कलाकार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मांडणी पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

जान्हवी किल्लेकर साकारणार रंजक भूमिका

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेसह ‘सायको रंगा’सारख्या चित्रपटातून जान्हवी किल्लेकरने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यानंतर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.

आता जान्हवी ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. सस्पेन्स थ्रिलरमध्ये तिची भूमिका नेमकी कशी असेल, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सचिन धोत्रेंचं दिग्दर्शन

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून ‘मिरांडा वॉर्निंग’ची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वी त्यांनी २०२३ मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

चित्रपटाचं लेखन रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी केलं आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

आता ‘मिरांडा वॉर्निंग’मध्ये जान्हवी किल्लेकरची भूमिका नेमकी काय आहे आणि हेरिटेजवाडी फार्महाऊसवरील खुनाचं रहस्य कसं उलगडणार, याची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २७ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Web Title: Miranda warning movie janhvi killekar mysterious look ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • entertainment
  • Janhvi Killekar
  • marathi movie

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
1

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
2

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी
3

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार
4

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.