
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘होय, मी आता वडील झालो आहे…’
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत जुबिन नौटियालने वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी तो म्हणाला, “होय, मी आता वडील झालो आहे. आमच्या मुलाचा जन्म १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी झाला. आई आणि बाळ दोघेही घरी परतले असून निरोगी आहेत.”
जुबिनच्या या आनंदाच्या बातमीमुळे त्याचे चाहतेही उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून जुबिन आणि त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जुबिनने बाबा झाल्याची बातमी दिल्यानंतर आता चाहते त्याच्या मुलाचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, गायकाने अद्याप बाळाचं नाव ठरलेलं नसल्याचं सांगितलं आहे.
बाळाच्या नावाबाबत विचारण्यात आलं असता जुबिन म्हणाला, “आम्ही अजून आमच्या मुलासाठी नावाचा विचार केलेला नाही. आम्ही फक्त त्याच्यासोबतच्या या सुंदर क्षणांचा आनंद घेत आहोत.”
सध्या जुबिन आणि त्याचं कुटुंब चिमुकल्या बाळाच्या आगमनाचा आनंद घेत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी झालेल्या या खास आगमनामुळे नौटियाल कुटुंबासाठी यंदाचा सण आणखी खास ठरला आहे.
जुबिन नौटियालने याच वर्षी एप्रिलमध्ये आपल्या बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली. उत्तराखंडमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत खासगी पद्धतीने पार पडला. या लग्नाला केवळ जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. विशेष म्हणजे, जुबिनने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत किंवा आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली नाही.