Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!

Sriya Reddy Mahakali: श्रिया रेड्डी ‘महाकाली’च्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे. जाणून घ्या कोण आहे श्रिया रेड्डी, तिचे वडील कोण आणि ‘सालार’मध्ये तिने कोणती भूमिका साकारली होती.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 09:22 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • श्रिया रेड्डी आहे तरी कोण?
  • महाकालीच्या रूपात श्रिया रेड्डीचा दमदार अंदाज
  • ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी
Sriya Reddy Mahakali: दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या बहुप्रतीक्षित ‘महाकाली’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पौराणिक थ्रिलरमध्ये अभिनेता अक्षय खन्ना ‘असुरगुरू शुक्राचार्य’ यांच्या दमदार भूमिकेत दिसत आहे. मात्र, टीझरच्या शेवटी अभिनेत्री श्रिया रेड्डी हिच्या महाकाली अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या प्रभावी पडद्यावरील उपस्थिती आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी श्रिया रेड्डी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. टीझरमधील तिच्या उग्र रूपाची झलक पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे.

महाकालीच्या रूपात श्रिया रेड्डीचा दमदार अंदाज

‘महाकाली’च्या टीझरमध्ये अक्षय खन्ना राक्षसांच्या अस्तित्वासाठी आणि १४ लोकांवरील त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवताना दिसतो. त्याचा लूक आणि अभिनय प्रभावी आहे. मात्र, टीझरच्या शेवटी श्रिया रेड्डीचा महाकाली अवतार समोर येताच संपूर्ण वातावरणच बदलून जातं.

टीझरमध्ये २ मिनिटे ४२ सेकंदांवर महाकालीची झलक पाहायला मिळते. एका क्षणी तिच्या डोळ्यांत माया आणि प्रेम दिसतं, तर पुढच्याच क्षणी त्यात प्रखर क्रोधाची भावना जाणवते. श्रिया रेड्डीच्या या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावर काही प्रेक्षक तिच्या या एका दृश्याचं कौतुक करत असून, तिची पडद्यावरील आभा अक्षय खन्नासारख्या अनुभवी अभिनेत्यालाही टक्कर देत असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “भावाला बिकिनी घालून राखी का बांधाल?”, कंगना रनौतने कृती सेननला सुनावलं; जाहिरातीवरून वाद पेटला

‘सालार’मध्येही गाजली होती श्रिया

मोठ्या स्टारसमोर आपल्या अभिनयाची छाप पाडण्याची श्रिया रेड्डीची ही पहिलीच वेळ नाही. याआधी तिने प्रशांत नील यांच्या ‘सालार: पार्ट १ – सीझफायर’ या चित्रपटात राधा राम मन्नार ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारख्या कलाकारांच्या उपस्थितीतही श्रियाच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या भूमिकेची तुलना ‘बाहुबली’मधील शिवगामी देवीच्या व्यक्तिरेखेशीही करण्यात आली होती.

‘सालार: पार्ट १ – सीझफायर’ने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली. चित्रपटाने जगभरात ६१७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचं सांगितलं जातं.

Don’t Be Shy : मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास…आलिया आणि शाहीन भट्टचा ‘डोंट बी शाय’ चित्रपट, ‘या’ तारखेला ग्लोबल प्रीमियर

श्रिया रेड्डी आहे तरी कोण?

श्रिया रेड्डीचा चित्रपटसृष्टीतील प्रवास रंजक राहिला आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८२ रोजी झाला. विशेष म्हणजे ती एका प्रतिष्ठित क्रीडा कुटुंबातून येते. श्रिया ही भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू भरत रेड्डी यांची मुलगी आहे.

भरत रेड्डी यांनी १९७८ ते १९८१ या कालावधीत भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं. ते यष्टीरक्षक म्हणून खेळले आणि भारतीय क्रिकेटमधील अनुभवी विकेटकीपर्सपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती.

दिनेश कार्तिकलाही दिलं प्रशिक्षण

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भरत रेड्डी यांनी युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याचं काम केलं. विशेष म्हणजे, भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात भरत रेड्डी यांनी त्याला प्रशिक्षण दिल्याचं सांगितलं जातं.

अशा क्रीडा पार्श्वभूमीतून आलेल्या श्रिया रेड्डीने अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘महाकाली’मधील तिचा दमदार अवतार प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Sriya reddy mahakali akshaye khanna who is sriya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
1

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
2

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
3

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष
4

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.