Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये विदेशी पिस्तुलासह २३ वर्षीय तरुणाला अटक; विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये अवैध विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मानेरेगेट परिसरातील माधुरी बारजवळ 20 नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरोधात भारतीय शस्त्र अधिनियमासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 22, 2026 | 04:23 PM
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये विदेशी पिस्तुलासह २३ वर्षीय तरुणाला अटक; विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये विदेशी पिस्तुलासह २३ वर्षीय तरुणाला अटक; विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • तरुणाकडे विदेशी बनावटीची पिस्तुल
  • मानेरेगेट येथे पोलिसांची कारवाई
  • उल्हासनगरात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
 

साई सावंत, उल्हासनगर

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाविरोधात कारवाई करत त्याला विदेशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये काही काळा भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मानेरेगेट येथे पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख जॉन्सन रॉबर्ट अँथनी (वय 23, रा. सेंट्रल हॉस्पिटल परिसर, टेकबहादूर कॉलनीजवळ, उल्हासनगर-3) अशी झाली आहे. 20 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 10:50 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर-4 येथील मानेरेगेट परिसरातील माधुरी बार अँड रेस्टॉरंटजवळ ही कारवाई करण्यात आली.
एका तरुणाकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून तपासणी केली असता आरोपीकडे विदेशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.

Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या… विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

उल्हासनगरात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

पोलिसांनी सांगितले की, ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार 16 नोव्हेंबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्रे, बंदुका, तलवारी, चाकू तसेच इतर शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही आरोपीने कोणतीही परवानगी न घेता पिस्तूल बाळगून या आदेशाचे उल्लंघन केले.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Firing News: खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार! अवघ्या ८ तासांत गुन्ह्याचा उलगडा

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिसाळ, पोलीस हवालदार सांगळे, पोलीस हवालदार दिलीप चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हासनगरमध्ये पिस्तुलासह कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: जॉन्सन रॉबर्ट अँथनी (वय 23) या तरुणाला विदेशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक करण्यात आली.

  • Que: ही कारवाई कोणत्या पोलिसांनी केली?

    Ans: विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

  • Que: आरोपीकडून काय जप्त करण्यात आले?

    Ans: आरोपीकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.

Web Title: Ulhasnagar crime news foreign made pistol seized vitthalwadi police arrest rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Crime Police
  • Fire
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar Politics : मुख्यमंत्र्यांच्या उल्हासनगर दौऱ्यात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! महापौरांना निमंत्रणच नाही; मेट्रोबाबतह
1

Ulhasnagar Politics : मुख्यमंत्र्यांच्या उल्हासनगर दौऱ्यात भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर! महापौरांना निमंत्रणच नाही; मेट्रोबाबतह

Fire Case: डोंबिवलीत संतापजनक थरार! ब्रेकअपचा निर्णय घेताच प्रियकराने पेटवले प्रेयसीचे घर; तरुणी आणि आई-वडिलांचा जीव…
2

Fire Case: डोंबिवलीत संतापजनक थरार! ब्रेकअपचा निर्णय घेताच प्रियकराने पेटवले प्रेयसीचे घर; तरुणी आणि आई-वडिलांचा जीव…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.