टेनिस अजिंक्यपद स्पर्धा (फोटो- सोशल मिडिय)
एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या ३० वर्षांवरील पुरुष गटात गणेश देवखिळे व गौरव राव या जोडीने अव्वल मानांकित गौरबदीप घोष व जयनारायण के. आर. या जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ५० वर्षांवरील पुरुष गटात हरजिंदर सिंग चिरागिया व संजय चंदवानी यांनी जतिंदर गंभीर व भूपिंदर कुमार यांचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.
५५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत बिगरमानांकित केतन बेडेकरने अव्वल मानांकित इलमुरुगु अय्यासामी यांचा ६-४, २-६, १०-५ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. ७० वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत शिव मोरने अव्वल मानांकित प्रदीप शर्मा यांचा ६-४, ७-५ असा, तर शाम गायकवाडने दुसऱ्या मानांकित रवींदर रेड्डी पेंडली यांचा ७-५, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…
५५ वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : केतन बेडेकर (भारत) वि.वि. इलमुरुगु अय्यासामी (भारत) [१] ६-४, २-६, १०-५, अशोक इंगळे (भारत) वि.वि. शशी गायकवाड (भारत) ६-०, ६-०,
६० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : संजय कुमार (भारत) [१] वि.वि. रघुनाथ होळंबे (भारत) ६-०, ६-३, एस. एन. वशिष्ठ (भारत) [२] वि.वि. आलोक रैना (भारत) ६-३, ६-४.
७० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : शिव मोर (भारत) वि.वि. प्रदीप शर्मा (भारत) [१] ६-४, ७-५, शाम गायकवाड (भारत) वि.वि. रवींदर रेड्डी पेंडली (भारत) [२] ७-५, ६-३.
८० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : कमलनयन शिरोळकर (भारत) वि.वि. सीताराम न्यायनिर्गुणे (भारत) [१] ६-१, ६-०, जनार्दन कांबळे (भारत) [२] वि.वि. दामोदर नंदा (भारत) ६-१ (सामना सोडून दिला).
दुहेरी : अंतिम फेरी : ३० वर्षांवरील पुरुष गट : गणेश देवखिळे / गौरव राव (भारत) वि. वि. गौरबदीप घोष / जयनारायण के. आर. (भारत) [१] ६-२, ६-४.
५० वर्षांवरील पुरुष गट : हरजिंदर सिंग चिरागिया / संजय चंदवानी (भारत) वि. वि. जतिंदर गंभीर / भूपिंदर कुमार (भारत) ६-२, ६-३,
Ans: कोहिनुर-एनईएस एमटी २०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस स्पर्धेत गणेश देवखिळे आणि गौरव राव यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.
Ans: ३० वर्षांवरील पुरुष दुहेरी गटात गणेश देवखिळे आणि गौरव राव यांनी अव्वल मानांकित गौरबदीप घोष व जयनारायण के. आर. यांचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.






