Girls' College Toilet Facilities Viral Video Raises Privacy Concerns ( मुलींच्या महाविद्यालयातील शौचालयांच्या सुविधांचा व्हायरल व्हिडिओ गोपनीयतेच्या चिंतेचे कारण ठरला आहे.)
या व्हिडिओमुळे शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या मूलभूत सुविधांचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था पाहून सोशल मिडियावर अनेकांनी चिंता व्यक्त केली जात आहे.
कॉलेज की लड़कियों के लिए ओपन
टॉयलेट/वॉशरूम… 🙆🏻 वायरल हो रहे एक वीडियो ने कॉलेजों में छात्राओं की बुनियादी सुविधाओं और निजता को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। वीडियो में छात्राओं के लिए बने वॉशरूम में कहीं दरवाज़े नहीं दिख रहे हैं, तो कहीं पार्टीशन इतने छोटे हैं कि प्राइवेसी पर सवाल उठना लाज़मी है। आखिर किसी भी शिक्षण संस्थान में पढ़ने वाली छात्राओं को इतनी बुनियादी सुविधा के लिए भी समझौता क्यों करना पड़े? शिक्षा के साथ-साथ उनकी सुरक्षा, सम्मान और निजता सुनिश्चित करना भी कॉलेज प्रशासन की जिम्मेदारी है। See threads 🧵👇🏻 — @hyy_᭄Shahid࿐( شاہِد) (@DarkKnight_29ca) November 18, 2026
व्हायरल व्हिडिओमध्ये स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था दिसून येत आहे. काही शौचालयांना दरवाजेच बसवण्यात आले नसल्याचे व्हिडिमध्ये दिसत आहेत. तर काही ठिकाणी शौचालयांमधील पार्टिशन्स इतके लहान आहेत की, त्यामुळे विद्यार्थिनींच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण होतो आहे. स्वच्छतागृहांसारख्या खासगी जागेतही विद्यार्थिनींना पुरेशी सुरक्षितता आणि गोपनीयता मिळत नसल्याचे या व्हिडिओतून समोर आला आहे.
कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे असणे ही अत्यंत मूलभूत गरज आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओतील दृश्यांमुळे संबंधित कॉलेज प्रशासनाच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होतोय. विद्यार्थिनींना अशा परिस्थितीत स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत असेल, तर त्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज कॉलेजमधील प्रशासनाला आहे.
शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, सन्मान आणि गोपनीयता जपण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची आहे. त्यामुळे संबंधित कॉलेज प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ कोणत्या कॉलेजचा आहे आणि प्रशासनाने यावर काही भूमिका घेतली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही.






