Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taylor Swift: टेलर स्विफ्टला भारत सरकार देणार पुरस्कार? दादासाहेब फाळके पुरस्काराच्या यादीवरून सोशल मीडियावर चर्चा

Taylor Swift: टेलर स्विफ्टचे नाव दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२६ च्या यादीत आल्याने चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या DPIFF आणि भारत सरकारच्या दादासाहेब फाळके पुरस्कारातील फरक.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2026 | 12:14 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Taylor Swift:  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (DPIFF) पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीत अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टचे नाव पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिला भारत सरकारकडून दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार का, असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. मात्र, या दोन्ही पुरस्कारांमध्ये मोठा फरक आहे. नेमका काय आहे हा फरक, जाणून घेऊया.

दादासाहेब फाळके पुरस्कार आणि DPIFF पुरस्कार वेगळे कसे?

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि योगदानात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो.

दुसरीकडे, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (DPIFF) हा मुंबईस्थित खासगी संस्थेद्वारे आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा आहे. नावात साधर्म्य असले तरी या दोन्ही पुरस्कारांचे आयोजन, स्वरूप आणि अधिकृत दर्जा वेगळा आहे. त्यामुळे DPIFF पुरस्कार मिळणे आणि भारत सरकारचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

Salman Khan Apologizes : श्रद्धा कपूरसमोर सलमान खानने व्यक्त केली खंत, फोन करून मागितली माफी; नेमकं काय घडलं

DPIFF पुरस्कार सोहळा यापूर्वीही वादात

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. २०२५ मध्ये मुंबई पोलिसांनी या पुरस्कार सोहळ्याचे संस्थापक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला होता. पुरस्कारांच्या नावाचा कथित गैरवापर करणे आणि सरकारचे समर्थक असल्याचा खोटा दावा करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.

टेलर स्विफ्टला कोणता पुरस्कार मिळणार?

शुक्रवारी जाहीर झालेल्या DPIFF पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांच्या यादीत रणवीर सिंह, यामी गौतम, अक्षय खन्ना, अनित पड्डा, कमल हासन, जयदीप अहलावत यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या टेलर स्विफ्टचे नावही या यादीत आहे.

यादीत टेलर स्विफ्टचे नाव पाहून अनेक चाहत्यांचा गोंधळ उडाला. तिला भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार असल्याचा काहींचा समज झाला. मात्र, तिला दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार नव्हे, तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२६ प्रदान केला जाणार आहे.

त्यामुळे या दोन्ही पुरस्कारांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ नावातील साधर्म्यामुळे दोन्ही पुरस्कार एकच असल्याचा समज करून घेऊ नये.

Kiran Mane: अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? अभिनेता किरण मानेचा सवाल; पोस्टमधून व्यक्त केला संताप!

Web Title: Taylor swift india government award dadasaheb phalke award list social media discussion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • dadasaheb phalke awards
  • entertainment

संबंधित बातम्या

Ajinkya Deo: ‘रामायण’च्या सेटवर कसं असायचं वातावरण? विश्वामित्र साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी सांगितले पडद्यामागचे किस्से!
1

Ajinkya Deo: ‘रामायण’च्या सेटवर कसं असायचं वातावरण? विश्वामित्र साकारणाऱ्या अजिंक्य देव यांनी सांगितले पडद्यामागचे किस्से!

Salman Khan Apologizes : श्रद्धा कपूरसमोर सलमान खानने व्यक्त केली खंत, फोन करून मागितली माफी; नेमकं काय घडलं
2

Salman Khan Apologizes : श्रद्धा कपूरसमोर सलमान खानने व्यक्त केली खंत, फोन करून मागितली माफी; नेमकं काय घडलं

Kiran Mane: अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? अभिनेता किरण मानेचा सवाल; पोस्टमधून व्यक्त केला संताप!
3

Kiran Mane: अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? अभिनेता किरण मानेचा सवाल; पोस्टमधून व्यक्त केला संताप!

Samay Raina: वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता पुरस्काराची चर्चा; समय रैनाला दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी
4

Samay Raina: वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता पुरस्काराची चर्चा; समय रैनाला दादासाहेब फाळके पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.