Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Paradise: नानीच्या ‘आया शेर’ची सिंहगर्जना! रिलीजपूर्वीच गाण्याने गाठला २० कोटी स्टोरी रीचचा टप्पा

नानीच्या 'द पॅराडाईज' चित्रपटातील 'आया शेर' गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. २०० मिलियन स्टोरी रीच आणि १.८ मिलियन लाईक्ससह गाण्याने नवा विक्रम प्रस्थापित केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

२०२६ मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाईज’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नॅचरल स्टार नानी यांच्या प्रमुख भूमिकेतील या चित्रपटातील ‘आया शेर’ हे गाणे प्रदर्शित होताच चार्टबस्टर ठरले असून सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या गाण्याने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या लोकप्रियतेला नवे शिखर गाठून दिले आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ‘द पॅराडाईज’ चर्चेत आहे. ‘दसरा’च्या ब्लॉकबस्टर यशानंतर नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांची जोडी पुन्हा एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे. दमदार फर्स्ट लूक, प्रभावी प्रमोशनल साहित्य आणि संगीतामुळे हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिला आहे.

Bhootam Bhayam Song: मिका सिंग आणि श्रीमान लिजेंडची जुगलबंदी! ‘भूतम भयम्’चं ‘हॅपी न्यू इयर’ गाणं ठरतंय सुपरहिट

दरम्यान, ‘आया शेर’ या दमदार गाण्याने इंटरनेटवर वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. गाण्याच्या जोशपूर्ण बीट्सवर चाहते रील्स तयार करत असून, नानीच्या सिग्नेचर डान्स स्टेप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्याने २० कोटी (२०० मिलियन) स्टोरी रीचचा टप्पा पार केला असून, त्याला १८ लाख (१.८ मिलियन) लाईक्स मिळाले आहेत.

Thank you for 200M+ for #AayaSher ❤️#TheParadiseTeaser Soon 🤗#TheParadise pic.twitter.com/Y5zIsamTD8 — Srikanth Odela (@odela_srikanth) July 26, 2026


स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडियापर्यंत ‘आया शेर’चे वर्चस्व कायम असून, या गाण्यामुळे ‘द पॅराडाईज’च्या प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांमधील उत्साह आणखी वाढला आहे.

Psycho Ranga Teaser: अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! सुबोध भावे-देवेंद्र चौगुले यांच्या ‘सायको रंगा’चा दमदार टीझर प्रदर्शित

एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली निर्मित ‘द पॅराडाईज’ हा चित्रपट २१ ऑगस्ट २०२६ रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे. जागतिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष तयारी केली आहे. दमदार कलाकार, भव्य मांडणी आणि मोठ्या प्रमाणातील प्रमोशनमुळे ‘द पॅराडाईज’ हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: The paradise aaya sher roar across social media crosses 200 million story reach milestone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi

संबंधित बातम्या

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश
1

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
2

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
3

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
4

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.