Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या भव्य प्री-रिलीज प्रमोशनल इव्हेंटमध्ये नानी, राघव जुयाल, सोनाली कुलकर्णी आणि कायडू लोहार सहभागी होणार आहेत. या सर्व कलाकारांची एकत्रित उपस्थिती चित्रपटाच्या रिलीजपूर्वीचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Paradise: ‘नॅचरल स्टार’ नानी स्टारर ‘द पॅराडाईज’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची रिलीजपूर्वीच जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा टीझर आणि ‘आया शेर’, ‘येशानागुला’ यांसारख्या गाण्यांना मिळालेला दमदार प्रतिसाद पाहता प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता चित्रपटाच्या प्री-रिलीज प्रमोशनल इव्हेंटसाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल झाली आहे.

मुंबईत रंगणार ‘द पॅराडाईज’चा प्री-रिलीज सोहळा

‘द पॅराडाईज’च्या भव्य प्री-रिलीज प्रमोशनल इव्हेंटमध्ये नानी, राघव जुयाल, सोनाली कुलकर्णी आणि कायडू लोहार सहभागी होणार आहेत. या सर्व कलाकारांची एकत्रित उपस्थिती चित्रपटाच्या रिलीजपूर्वीचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांनी केले आहे. यापूर्वी नानी आणि श्रीकांत ओडेला या जोडीने ‘दसरा’सारखा गाजलेला चित्रपट दिला आहे. त्यामुळे या जोडीच्या आगामी चित्रपटाकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

नानीचा इंटेन्स अवतार चर्चेत

‘द पॅराडाईज’च्या टीझरमध्ये नानी यांचा वेगळाच आणि दमदार अंदाज पाहायला मिळतो. झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात नानी यांनी जदल ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तो एका वेश्येचा मुलगा असल्याचे कथेत दाखवण्यात आले आहे.

चित्रपटात रॉ इंटेन्सिटी, मास एनर्जी आणि हाय-ऑक्टेन अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे टीझरमधून दिसत आहे. दुसरीकडे, राघव जुयाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांची व्यक्तिरेखाही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Salman Khan: तमन्ना भाटियाचा आवाज ऐकून सलमान खान भारावला; ‘बिग बॉस २०’मध्ये केलं भरभरून कौतुक

‘आया शेर’ आणि ‘येशानागुला’ला जबरदस्त प्रतिसाद

‘द पॅराडाईज’च्या गाण्यांनाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील ‘आया शेर’ या गाण्याने यूट्यूबवर २०० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि १.८ मिलियनहून अधिक लाइक्स मिळवल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या गाण्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रील्सही तयार करण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे, ‘येशानागुला’ या गाण्यानेही यूट्यूबवर ११९ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि ७००K लाइक्सचा टप्पा पार केला आहे. या दोन्ही गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाच्या संगीताचीही चर्चा होत आहे.

२४ सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार रिलीज

SLV सिनेमाजच्या निर्मितीखाली तयार झालेला ‘द पॅराडाईज’ २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या जागतिक स्तरावरील प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे. दमदार स्टारकास्ट, श्रीकांत ओडेला यांचे दिग्दर्शन आणि नानी यांचा वेगळा अवतार यामुळे ‘द पॅराडाईज’च्या रिलीजकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Web Title: The paradise nani raghav juyal pre release event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
1

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
2

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
3

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Mahaveer Karna: सूर्यपुत्र कर्णाची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार कर्णाची भूमिका, फर्स्ट लूक चर्चेत
4

Mahaveer Karna: सूर्यपुत्र कर्णाची गाथा मोठ्या पडद्यावर; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार कर्णाची भूमिका, फर्स्ट लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.