Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Paradise: नानीच्या ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा डॅलसमध्ये ग्रँड लॉन्च; अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये होणार धमाका!

The Paradise: नानीच्या बहुप्रतिक्षित ‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा २८ ऑगस्टला डॅलसमध्ये अनिरुद्ध रविचंदर यांच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ग्रँड लॉन्च होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 28, 2026 | 03:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

The Paradise:  नॅचरल स्टार नानीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द पैराडाइज’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘जर्सी’ आणि ‘हाय नन्ना’सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा नानी या सिनेमात एका वेगळ्या आणि रॉ अवतारात दिसणार आहे. दिग्दर्शक श्रीकांत ओडेला आणि नानी यांचा हा दुसरा चित्रपट असून, याआधी दोघांनी ‘दसरा’मध्ये एकत्र काम केले होते.

चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं ‘आया शेर’ रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये ‘द पैराडाइज’ची उत्सुकता वाढली आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या सिंगलच्या लॉन्चची मोठी घोषणा केली आहे.

डॅलसमध्ये होणार दुसऱ्या सिंगलचा लाईव्ह लॉन्च

‘द पैराडाइज’चं बहुप्रतिक्षित दुसरं सिंगल २८ ऑगस्ट रोजी डॅलसमध्ये लाईव्ह लॉन्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये हे गाणं हजारो चाहत्यांसमोर स्टेजवर लॉन्च केलं जाणार आहे.

या खास सोहळ्यासाठी नॅचरल स्टार नानीदेखील डॅलसला पोहोचला आहे. त्यामुळे अनिरुद्धच्या कॉन्सर्टमध्ये नानीची उपस्थिती आणि ‘द पैराडाइज’च्या गाण्याचा लाईव्ह लॉन्च हा चाहत्यांसाठी खास अनुभव ठरणार आहे.

मेकर्सच्या माहितीनुसार, स्टेजवर गाण्याचा लॉन्च झाल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी ते डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करण्यात येईल.

अनिरुद्ध-कसरला श्याम यांची खास जोडी

‘द पैराडाइज’साठी अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलं आहे. दुसऱ्या सिंगलसाठी त्यांच्यासोबत प्रसिद्ध गीतकार कसरला श्याम यांनी काम केलं आहे. ‘दसरा’मधील ‘चमकीला एंजेल्सी’सारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी कसरला श्याम ओळखले जातात. ‘बलगम’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यामुळे अनिरुद्ध आणि कसरला श्याम यांची ही जोडी नव्या गाण्यात काय कमाल करते, याकडे संगीतप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

‘आया शेर’ला मिळाला तुफान प्रतिसाद

‘द पैराडाइज’च्या पहिल्या सिंगल ‘आया शेर’ने यूट्यूबवर २०० मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. या गाण्याला १.८ मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले असून, सोशल मीडियावरही ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. नानीचा लूक आणि त्याचा हुकस्टेप चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

२४ सप्टेंबरला चित्रपटगृहात येणार ‘द पैराडाइज’

एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली तयार झालेला ‘द पैराडाइज’ २४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्लिश, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा ८ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

नानीचा दमदार अवतार, श्रीकांत ओडेला यांचं दिग्दर्शन आणि अनिरुद्धचं संगीत यामुळे ‘द पैराडाइज’च्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत

Web Title: The paradise second single live launch nani anirudh ravichander dallas concert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • bollywood Flim
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.