Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 Marathi Movie : ‘देऊळ बंद २’ च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मने, चित्रपट खेचणार तुफान गर्दी

मुंबई : देऊळ बंद २ च्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. “आता परीक्षा देवाची” या टॅगलाईनमुळे कथेबद्दल नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 07:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बहुप्रतिक्षित देऊळ बंद २ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची प्रचंड लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वीच २१ मे २०२६ ही प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाबाबतची चर्चा आणखी रंगली आहे. “आता परीक्षा देवाची” ही टॅगलाईन प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिकाच उभी करते—या वेळी स्वामींची परीक्षा कोण घेणार? की भक्तांची श्रद्धा कसोटीवर लागणार?

Deep Jyoti Marathi Serial : Heroine साठी दिली Audition पण ठरली खलनायिका! मानसी सुभाषने केला भूमिकेबद्दल मोठा उलगडा

पहिल्या भागात आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा आणि सादरीकरणातील गूढता यामुळे प्रेक्षकांना स्वामी समर्थ प्रत्यक्ष आपल्या समोर उभे असल्याचा अनुभव आला होता. त्यामुळेच “देऊळ बंद २” मध्येही त्यांच्याकडून तितकाच प्रभावी अभिनय पाहायला मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोस्टरमधील दृश्य अत्यंत लक्षवेधी आहे. अभिनेत्री स्नेहल तरडे दुचाकी चालवत असून त्यांच्या मागे स्वामी समर्थ प्रसन्न मुद्रेत बसलेले दिसतात. मात्र या प्रसन्नतेच्या पार्श्वभूमीवर स्नेहल यांच्या चेहऱ्यावर दिसणारा राग आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू ही कथा अधिक गूढ आणि भावनिक असल्याचे सूचित करतात. हा विरोधाभासच चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा ठरतो. ‘भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात’ हा भाव पोस्टरमधून प्रभावीपणे व्यक्त होतो.

विशेष म्हणजे, पहिल्या भागात स्वामींना आलिशान गाडीतून प्रवास करताना दाखवण्यात आले होते. मात्र या वेळी ते एका सामान्य महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. यामधून दिग्दर्शकांनी समाजातील सामान्य माणसांच्या जीवनातील संघर्ष आणि श्रद्धेची ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागात एका सामान्य कुटुंबाची असामान्य कथा, त्यांचे दुःख, त्यांचा संघर्ष आणि स्वामीकृपेने होणारे परिवर्तन यांचा भावनिक प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे संकेत मिळतात.

चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहेत. त्यांच्या दमदार कथनशैलीमुळे आणि वास्तववादी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करेल, अशी अपेक्षा आहे. निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली असून वटवृक्ष एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला गेला आहे.

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत होणार क्रांतीपर्वाची सुरुवात! ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची धमाकेदार Entry

“देऊळ बंद” या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. श्रद्धा, अध्यात्म, संघर्ष आणि समाजातील वास्तव यांचा संगम असलेला हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल, अशी चिन्हे दिसत आहेत. एकूणच, “देऊळ बंद २” च्या पोस्टरनेच चित्रपटाची ताकद दाखवून दिली आहे. आता २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर किती मोठी कमाई करतो आणि प्रेक्षकांच्या मनावर किती गारूड करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: The poster of deool band 2 has won the hearts of the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • girish mahajan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.