Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Traitors 2: रिया चक्रवर्तीसह 5 स्पर्धक शो मधून बाहेर! श्वेता तिवारीच्या ‘मर्डर’नंतर बदलला गेम

The Traitors 2: करण जोहरच्या 'द ट्रेटर्स २' या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आता फक्त एकच गद्दार उरला आहे, तर एकाच वेळी ५ स्पर्धक बाहेर गेलते, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2026 | 10:58 AM
द ट्रेटर्समध्ये ५ खेळाडू एकाच वेळी बाहेर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

द ट्रेटर्समध्ये ५ खेळाडू एकाच वेळी बाहेर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • द ट्रेटर्स २ हा रियालिटी गेम शो सध्या बराच चर्चेत आहे 
  • श्वेता तिवारीच्या मर्डरनंतर आता एकाच वेळी ५ स्पर्धक बाहेर आले आहेत 
  • नक्की काय घडले जाणून घ्या 
The Traitors 2: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओचा उत्कंठावर्धक आणि बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांनी भरलेला रिॲलिटी शो ‘द ट्रेटर्स २’ जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या नवीन भागांनी प्रेक्षक आणि स्पर्धक दोघांनाही थक्क केले आहे. फसवणूक आणि रणनीतीच्या या खेळाने केवळ एक-दोन नव्हे, तर एकाच वेळी पाच स्पर्धकांना बाहेर काढले आहे. श्वेता तिवारीच्या मर्डरपासून ते निरपराधांच्या चुकीच्या निर्णयांपर्यंत, या आठवड्याच्या शोमध्ये असे सर्व काही पाहायला मिळाले, ज्यामुळे खेळाची दिशाच पूर्णपणे बदलली.

सर्वात मोठा धक्का भागाच्या सुरुवातीलाच बसला, जेव्हा लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि शोमधील सर्वात प्रबळ स्पर्धकांपैकी एक मानली जाणारी श्वेता तिवारी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर आली नाही. Traitor ने रात्रीच्या अंधारात श्वेताचा काटा करून तिला खेळातून बाहेर काढले होते. श्वेताच्या बाहेर पडण्याने उर्वरित स्पर्धकांमध्ये स्पष्टपणे भीती आणि संताप दोन्ही निर्माण झाल्याचे दिसून आले आणि अनेकांनी यावेळी बदला घेण्याची शपथ घेण्यास सुरुवात केली.

The Traitors 2: मोठा ट्विस्ट! एक ट्रेटर अन् ३ इनोसेंट्सचा गेम ओव्हर; चार दमदार स्पर्धकांची शोमधून एक्झिट

शहनील गिलची गुपिते उघड

शोमधील खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला, जेव्हा सर्व स्पर्धक ‘सर्कल ऑफ शॉक’ दरम्यान एकत्र बसले. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, शहनील आणि क्रिस्टल डिसुझा यांना सकाळी मिळणाऱ्या पत्रांबद्दल विचारण्यात आले. क्रिस्टलने लगेच उत्तर दिले, पण शहनीलने सबबी सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की, ती पत्रे पूर्ण वाचत नाही आणि फक्त पहिल्या तीन ओळी पाहते. तिच्या या उत्तरांमुळे इतर स्पर्धकांना संशय आला. शहनीलची चोरी रंगेहाथ पकडली गेली आणि सर्वांनी तिला मत देऊन बाहेर काढले.

क्रिस्टलचा मास्टरस्ट्रोक

शहनील बाहेर पडल्यानंतर, एकमेव उरलेली ट्रेटर, क्रिस्टल डिसूझाला नवीन जोडीदार निवडण्याची संधी मिळाली. क्रिस्टलने आपला डावा अत्यंत हुशारीने आखलेला यावेळी दिसून आला. या खेळीत, डिजिटल कंटेंट क्रिएटर रिदा थरानीला तिच्या टीममध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला, जो रिदाने स्वीकारला. रिदा सामील होताच, त्यांनी शो ची हुशार गुप्तहेर, तान्या पुरी, हिच्या हत्येचा कट रचला, जिला क्रिस्टल आणि रिदाच्या योजनांची पूर्ण कल्पना होती.

The Traitors Season 2: ‘द ट्रेटर्स 2’चा टीझर आऊट, करण जोहरसह रंगणार विश्वास विरुद्ध विश्वासघाताचा थरार

पाच खेळाडू बाद, इनोसेंट्स बॅकफूटवर

या आठवड्याचा खेळ इनोसेंट्ससाठी अत्यंत कठीण ठरला. कॉफिन टास्क दरम्यान, रॅपर इक्का टास्क पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने बाद झाला. दरम्यान, ‘सर्कल ऑफ शॉक’ मध्ये, गैरसमज आणि परस्पर संशयामुळे रिया चक्रवर्ती आणि कंटेंट क्रिएटर अंश हे दोन वरवर पाहता निर्दोष वाटणारे खेळाडू बाद झाले. दोन हत्या, दोन राऊंड-टेबल एलिमिनेशन आणि एका टास्कमधून बाहेर पडल्याने, एकूण पाच खेळाडू बाद झाले आहेत. ट्रेटर्समध्ये क्रिस्टल आणि रिदाची ही नवीन जोडी पुढे कोणती जादू घडवून आणेल, किंवा इनोसेंट्स त्यांच्या चुकांमधून शिकून ट्रेटर नक्की कोण हे उघडकीस आणतील का, हे पाहणे आता मनोरंजक ठरेल! प्रेक्षकांची उत्सुकता तर आता अगदीच शिगेला पोहचली आहे. 

Web Title: The traitors 2 5 contestants out from the show rhea chakraborty shweta tiwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Reality Show
  • Shweta Tiwari
  • The Traitors

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
2

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल
3

Nana Patekar: १.५ कोटींची लक्झरी कार सोडून नाना पाटेकरांनी शेतकरी कुटुंबासाठी उचलले होते मोठे पाऊल

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’
4

Nana Patekar Passed Away: कसा होता नानांचा जीवनप्रवास, गरीबी आणि संघर्षातून कमावले नाव; खऱ्या अर्थाने ‘नटसम्राट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.