
The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
SACNILK ने दिलेल्या माहितीनुसार, ‘द वन’ ने पहिल्या दिवशी भारतात 8.51 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 10.20 कोटी आहे. देशभरात 1420 शो लागले होते आणि थिएटरमध्ये फक्त 26 टक्के लोक होते.पण सिद्धार्थसाठी ही कमाई चांगली मानली जात आहे. कारण त्याचे मागचे 10 सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार चालले नव्हते. त्या मानाने ‘द वन’ ची ओपनिंग चांगली झाली आहे. त्याच्या मागच्या सिनेमांच्या तुलनेत या सिनेमाने पहिल्या दिवशी जास्त पैसे कमावले आहेत.
बॉक्स ऑफिसवर आकडा ठीकठाक असला तरी समीक्षकांनी सिनेमाला एकदम नाकारलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या प्रसिद्ध समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी या सिनेमाला ‘टॉर्चर’ असं म्हटलं आहे आणि फक्त अर्धा स्टार दिला आहे.सोशल मीडियावर पण सिनेमाचे मीम्स बनत आहेत, लोक ट्रोल करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की वन देवीची गोष्ट आणि छठ पूजा हा विषय चांगला होता, पण कथा एवढी भरकटली आहे की बघवत नाही. सिनेमा शेवटपर्यंत बांधून ठेवत नाही, वेगवेगळे ट्रॅक टाकून आणखी गोंधळ केला आहे.
TVF कडून अपेक्षा होत्या पण…या सिनेमाकडून लोकांच्या अपेक्षा जास्त होत्या कारण याचं दिग्दर्शन TVF ने केलं आहे. पंचायत सारखी भारी वेबसिरीज बनवणारे दीपक कुमार मिश्रा यांनी या सिनेमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिग्दर्शन केलं आहे.
कल्पना चांगली होती, कलाकारांनी पण काम चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे, पण रिसर्च नीट केला नाही, कथा विस्कळीत आहे आणि गरज नसताना जास्त गोष्टी दाखवल्या आहेत. त्यामुळे एक चांगली रहस्यमय कथा होऊ शकली नाही, असं लोक म्हणत आहेत.दिग्दर्शन ठीक आहे पण VFX अजून चांगला करायला हवा होता, असं पण बोललं जात आहे.या सिनेमाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, अरुणाभ कुमार आणि नीरज कोठारी यांनी केली आहे.