Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Toxic OTT Release: यश आणि नयनतारा यांचा ‘टॉक्सिक’ सिनेमा ओटीटीवर येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 25 सप्टेंबर 2026 रोजी ZEE5 वर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 09:40 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Toxic OTT Release:  साऊथ सिनेमातील दिग्गज अभिनेता यशच्या ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ‘केजीएफ: चॅप्टर 2’नंतर यश मोठ्या पडद्यावर परतत असल्याने या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, रिलीज झाल्यानंतर या अपेक्षा काहीशा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवता आलं नाही. आता थिएटरनंतर ‘टॉक्सिक’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘टॉक्सिक’ची ओटीटी रिलीज कधी?

गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक’ हा पॅन इंडिया गँगस्टर अॅक्शन ड्रामा आहे. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्याच्या कथानकावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही प्रेक्षकांनी सिनेमाचं कौतुक केलं, तर काहींनी कथा आणि मांडणीवर नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरही सिनेमाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

आता ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांचं लक्ष त्याच्या ओटीटी रिलीजकडे लागलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश, नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ 25 सप्टेंबर 2026 रोजी ZEE5 वर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.

123Teluguच्या रिपोर्टनुसार, ‘टॉक्सिक: ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’चा ओटीटी प्रीमियर 25 सप्टेंबरला होण्याची अपेक्षा आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मकडून अद्याप या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही रिलीज डेट अंतिम आहे, असं सध्या निश्चितपणे म्हणता येणार नाही.

रिलीजच्या जवळपास महिन्याभरातच ओटीटीवर

जर 25 सप्टेंबरची तारीख निश्चित झाली, तर सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच ‘टॉक्सिक’ ओटीटीवर पाहता येणार आहे. हा सिनेमा विविध भाषांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

यशचा वेगळा अंदाज

‘टॉक्सिक’मध्ये यशने एका गँगस्टरची भूमिका साकारली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील गोव्याच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची कथा घडते. गुन्हेगारी विश्व, अॅक्शन, नाती, निष्ठा आणि नैतिकतेच्या संघर्षाभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. यशच्या व्यक्तिरेखेचा प्रवास निष्ठा, नैतिकता आणि पश्चात्ताप यांच्यात अडकलेला पाहायला मिळतो.

गीतू मोहनदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता थिएटरमध्ये अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर ओटीटीवर ‘टॉक्सिक’ला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Web Title: Toxic ott release yash nayanthara zee5 release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • OTT
  • Yash

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट
1

Bigg Boss 20 Nomination: या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क रद्द; बिग बॉसने ‘या’ 3 स्पर्धकांना थेट केलं नॉमिनेट

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!
2

Ganesh Chaturthi Songs: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ‘ही’ 10 सुपरहिट गाणी लावाच; या गाण्यांशिवाय अधुरा वाटेल गणेशोत्सव!

Prasad Oak Award:  प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक
3

Prasad Oak Award: प्रसाद ओक ठरला ‘कला क्षेत्रातील ३६० डिग्री मॅन’; मुख्यमंत्री फडणवीसांकडून खास कौतुक

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल
4

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.