Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला

'सौभाग्यवती सरपंच २' चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित झाले असून, ही वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या पर्वात गावपातळीवरील राजकारण, सत्तासंघर्ष, अफवांचे राजकारण आणि पाणीटंचाईसारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पाणीटंचाईसारख्या सामाजिक प्रश्नांना कथानकाचा केंद्रबिंदू बनवण्यात आले आहे.
  • प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात ती आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता लोकांच्या विश्वासासाठी लढताना दिसते.
  • वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.
महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली लोकप्रिय वेब सिरीज ‘सौभाग्यवती सरपंच’ आता नव्या पर्वासह परतत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच २’ चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, ही बहुप्रतीक्षित वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागात एका सामान्य महिलेचा सरपंचपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आणि महिला नेतृत्वाची ताकद प्रभावीपणे मांडण्यात आली होती. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता दुसऱ्या पर्वात कथा अधिक व्यापक आणि संघर्षमय स्वरूपात पुढे सरकते. यावेळी गावपातळीवरील राजकारण, सत्तासंघर्ष, अफवांचे राजकारण, नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि पाणीटंचाईसारख्या सामाजिक प्रश्नांना कथानकाचा केंद्रबिंदू बनवण्यात आले आहे.

Sonali Bendre :  सोनाली बेंद्रेला लेक रणवीरने सोशल मीडियावर केलंय ब्लॉक; अभिनेत्रीने सांगितलं नेमकं कारण

कथेत अण्णा गाव सोडल्यानंतर त्याच्या जागी नाना नावाचा अधिक धूर्त आणि प्रभावशाली प्रतिस्पर्धी मैदानात उतरतो. तो केवळ राजकारण करत नाही, तर गावात खोट्या अफवा पसरवून आणि नात्यांमध्ये फूट पाडून अवलीविरोधात वातावरण तयार करतो. खोटे आरोप, कौटुंबिक संघर्ष आणि बालविवाहाच्या प्रकरणामुळे अवलीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होतो. मात्र, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात ती आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता लोकांच्या विश्वासासाठी लढताना दिसते.

‘सौभाग्यवती सरपंच २’मध्ये सत्ता, स्वार्थ आणि अफवांच्या राजकारणाविरुद्ध सत्य, धैर्य आणि लोकहिताची लढाई अधिक प्रभावीपणे उलगडली जाणार आहे. अवली पुन्हा एकदा गावाचा विश्वास संपादन करू शकेल का, याची उत्सुकता संपूर्ण कथेत कायम राहते. या वेब सिरीजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, आशा ज्ञाते, मिलिंद शिंदे, अश्विनी कुलकर्णी आणि पद्मनाभ भिंड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी ग्रामीण वास्तव, सामाजिक प्रश्न आणि मनोरंजनाचा प्रभावी मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Bol Bol Rani Movie Review : ही गुंतागुंतं कधी सुटणार का? ‘बोल बोल राणी’ आज सिनेमागृहात! सईच्या अभिनयाने प्रेक्षक दंग

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही महिला नेतृत्व, जिद्द आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे. जलसंवर्धन आणि गावपातळीवरील सुशासनासारख्या महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारी ही मालिका प्रेक्षकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास आहे. महिला नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी मांडणारी ‘सौभाग्यवती सरपंच २’ ही वेब सिरीज २४ जुलै २०२६ पासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

Web Title: Trailer and poster of saubhagyavati sarpanch 2 released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • hit movies
  • Official Trailer

संबंधित बातम्या

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा जाळं; पावलापावला मृत्यूचे सावट, थरथरवणारा थरार
1

Indrajaal Trailer : बरसणार अघोरी आभाळ… ‘इंद्रजाल’! जंगल नाही इंद्राचा जाळं; पावलापावला मृत्यूचे सावट, थरथरवणारा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.