Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडेकोट सुरक्षेनंतरही ‘रामायण’चा ट्रेलर लीक; रणबीर कपूरच्या दमदार एन्ट्रीने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर अधिकृत प्रदर्शनापूर्वीच ऑनलाइन लीक झाला असून रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्या झलकांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 03:39 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. १८ जुलै रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनाच ट्रेलर दाखवण्यात आला होता. मात्र, एवढ्या कडक बंदोबस्तानंतरही ट्रेलरमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर लीक झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेलरच्या अनेक क्लिप्स वेगाने व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ बनावट असल्याचे सांगितले जात असले, तरी काही क्लिप्स खऱ्या असल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल क्लिप्समुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

लीक झालेल्या क्लिप्समध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दमदार एन्ट्री करताना दिसत आहे. साई पल्लवी माता सीता, अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकेयी आणि यश रावणाच्या भूमिकेत झळकत आहेत. रणबीरची डोळ्यांवर पट्टी बांधून घोडेस्वारी करतानाची झलक आणि प्रभू रामांच्या वनवासाचा प्रसंग विशेष चर्चेत आहे. वनवासाची बातमी ऐकल्यानंतर सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीच्या चेहऱ्यावर उमटलेले शांत आणि भावनिक भावही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Yash’s first appearance as Ravana has leaked from the #Ramayana ( Bharat Mandapam event )and that part looks promising. But from the leaked footage, Ranbir and Sai pallavi dialogue delivery felt a little off. Hopefully it’s just the leaked quality.otherwise. we might be… pic.twitter.com/BauHgswc9A — PintuX (@pintya_348) July 19, 2026

 

बिंज-वॉचिंगसाठी बेस्ट! क्राईम, सस्पेन्स आणि थराराचा तिहेरी डोस; JioHotstar वरील ‘या’ ५ वेबसीरिज अजिबात मिस करू नका

दरम्यान, रावणाच्या भूमिकेतील यशची विस्तारित झलकही समोर आली असून, त्याचा दमदार लूक आणि गर्जना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. हनुमानाची भूमिका साकारणारे सनी देओल यांनी याआधीच पहिल्या भागात त्यांची भूमिका मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमादरम्यान ट्रेलर रेकॉर्डिंगला पूर्णपणे बंदी होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डिंगचा प्रयत्न करणाऱ्यांचे मोबाईल जप्त केल्याच्याही चर्चा आहेत. तरीही ट्रेलरच्या क्लिप्स बाहेर कशा आल्या, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, याआधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील VFX आणि दर्जावर काहींनी टीका केली होती. मात्र, आता लीक झालेल्या ट्रेलरमधील दृश्यांनी चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर आता अधिकृत ट्रेलर आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

‘रामायण : भाग १’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण

Web Title: Trailer leaked ahead of release ranbir kapoors powerful entry in ramayana sends social media into a frenzy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • ranbir kapoor
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण
1

‘मला पुरुषांचा तिरस्कार वाटतो’; ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम साक्षी झा वादाच्या भोवऱ्यात, नोकरी गेल्याच्या चर्चांना उधाण

बिंज-वॉचिंगसाठी बेस्ट! क्राईम, सस्पेन्स आणि थराराचा तिहेरी डोस; JioHotstar वरील ‘या’ ५ वेबसीरिज अजिबात मिस करू नका
2

बिंज-वॉचिंगसाठी बेस्ट! क्राईम, सस्पेन्स आणि थराराचा तिहेरी डोस; JioHotstar वरील ‘या’ ५ वेबसीरिज अजिबात मिस करू नका

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर
3

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर

प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना केला स्पर्श; ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
4

प्रभू रामाने हनुमानाच्या चरणांना केला स्पर्श; ‘रामायण’च्या ट्रेलर लाँचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.