Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tabu New Web Series: तब्बूची पहिल्यांदाच हिंदी वेब सीरिजमध्ये एन्ट्री, ‘टनल मेन’मधून उलगडणार उत्तराखंड बचावकार्याची कहाणी

Tabu New Web Series: अभिनेत्री तब्बू वायआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्सवरील ‘टनल मेन’ सीरिजमध्ये झळकणार आहेत. २०२३ मधील उत्तराखंड टनेल रेस्क्यूवरून प्रेरित आहे ही काल्पनिक कथा.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2026 | 03:12 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tabu New Web Series:बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री तब्बू लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वायआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्सवरील आगामी ‘टनल मेन’ या सीरिजमध्ये त्या झळकणार आहेत. विशेष म्हणजे, या निमित्ताने तब्बू पहिल्यांदाच हिंदी ओरिजिनल स्ट्रीमिंग सीरिजमध्ये काम करणार आहेत. २०२३ मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या टनेल रेस्क्यूच्या घटनेपासून प्रेरित असलेली ही काल्पनिक ड्रामा सीरिज असणार आहे.

उत्तराखंडमधील टनेल रेस्क्यूवर आधारित आहे ‘टनल मेन’

नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तराखंडमधील कोसळलेल्या बोगद्यात अनेक कामगार अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अनेक दिवस अत्यंत आव्हानात्मक बचावकार्य सुरू होते. संपूर्ण देशाचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. याच घटनेमागील जिद्द, धैर्य, सांघिक प्रयत्न आणि कठीण परिस्थितीतही कायम राहिलेली आशा या भावनांपासून ‘टनल मेन’ ही सीरिज प्रेरित आहे. ही प्रत्यक्ष घटनेवर आधारित माहितीपट नसून त्यापासून प्रेरणा घेतलेली काल्पनिक ड्रामा सीरिज आहे.

तीन दशकांहून अधिक काळ तब्बूचा अभिनयाचा प्रवास

तब्बू यांनी आपल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत हिंदीसह विविध भाषांमधील चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडली आहे. ‘माचिस’ आणि ‘चांदनी बार’ या चित्रपटांमधील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय ‘मकबूल’, ‘हैदर’ आणि ‘अंधाधुन’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही तब्बू यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मीरा नायर यांच्या ‘द नेमसेक’मध्ये त्यांनी अशिमा गांगुलीची भूमिका साकारली होती. तसेच आंग ली यांच्या ‘लाइफ ऑफ पाय’ आणि ‘ड्यून: प्रोफेसी’ या प्रोजेक्ट्समध्येही त्या झळकल्या आहेत. ‘ड्यून: प्रोफेसी’मध्ये त्यांनी सिस्टर फ्रान्सेस्का ही भूमिका साकारली होती.

‘द रेल्वे मेन’चे दिग्दर्शक सांभाळणार शोरनरची जबाबदारी

‘टनल मेन’ या सीरिजच्या शोरनरपदाची जबाबदारी शिव रवैल सांभाळणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘द रेल्वे मेन’ या सीरिजचे दिग्दर्शन केले होते. आता ‘टनल मेन’मधून धैर्य, जिद्द आणि मानवी संवेदनशीलतेची नवी कथा ते प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर

वायआरएफ एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सची क्रिएटिव्ह भागीदारी

वायआरएफ एंटरटेनमेंटमध्ये सीईओ अक्षय विधानी यांच्या नेतृत्वाखाली हेड ऑफ कंटेंट म्हणून रुजू झाल्यानंतर सौगता मुखर्जी यांचा ‘टनल मेन’ हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्कॅम १९९२’, ‘महारानी’, ‘तब्बर’ आणि ‘रॉकेट बॉईज’ यांसारख्या लोकप्रिय सीरिजशी संबंधित काम केले आहे. त्यांच्या कामाशी संबंधित ‘आर्या’, ‘रॉकेट बॉईज’ आणि ‘रिअल काश्मीर फुटबॉल क्लब’ या सीरिजना इंटरनॅशनल एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते.

‘टनल मेन’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने वायआरएफ एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांच्यातील क्रिएटिव्ह भागीदारी पुढे सुरू राहणार आहे. या भागीदारीची सुरुवात २०२३ मध्ये ‘द रोमँटिक्स’ या सीरिजपासून झाली होती. आता तब्बूंच्या सहभागामुळे ‘टनल मेन’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर

Web Title: Tabu new web series tunnel men netflix uttarakhand tunnel rescue ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • Tabu

संबंधित बातम्या

Harshvardhan Rane: हर्षवर्धन राणेला मिळाली कोट्यवधींची Defender Octa SUV! ‘सनम तेरी कसम’च्या निर्मात्याने दिलं खास गिफ्ट
1

Harshvardhan Rane: हर्षवर्धन राणेला मिळाली कोट्यवधींची Defender Octa SUV! ‘सनम तेरी कसम’च्या निर्मात्याने दिलं खास गिफ्ट

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर
2

Panchayat Season 5 Release Date: याचवर्षी पुन्हा गाजणार फुलेरा गाव! ‘पंचायत सीझन 5’ची अधिकृत घोषणा, रिलीज डेटही आली समोर

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
3

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Dia Mirza: ‘अनुभव खूपच त्रासदायक..’; दिया मिर्झाची नवाजुद्दीनवर संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?
4

Dia Mirza: ‘अनुभव खूपच त्रासदायक..’; दिया मिर्झाची नवाजुद्दीनवर संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.