Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांदरम्यान अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खास विनंती केली आहे. तुकाराम मुंढे यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळताना दिसत असून, त्यांच्या कामाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंना बॉलिवूडमधूनही पाठिंबा
  • तुकाराम मुंढेंच्या बदलीवर परेश रावल यांची पोस्ट चर्चेत
  • फडणवीसांकडे केली मोठी मागणी
 

Tukaram Mundhe: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरू आहे. कडक आणि शिस्तबद्ध प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांना आता बॉलिवूडमधूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांच्या कामाचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.

तुकाराम मुंढे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत नियमांनुसार आणि कठोरपणे काम केल्याची प्रतिमा आहे. त्यांच्या अनेकदा बदल्या झाल्या आहेत. आता त्यांच्या सध्याच्या बदलीच्या चर्चांदरम्यान ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खास विनंती केली आहे. परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांना टॅग केले आहे.

परेश रावल यांची मुख्यमंत्र्यांकडे खास विनंती

परेश रावल यांनी रविवारी, ९ ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुकाराम मुंढे यांची सध्याच्या विभागातून बदली किंवा त्यांना पदावरून हटवले जाऊ नये, याची खात्री करण्याचे आवाहन केले.

परेश रावल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुकाराम मुंढे यांचे संरक्षण करणे आणि त्यांना त्यांच्या विभागात काम करत राहण्याची परवानगी देणे हे मुख्यमंत्र्यांचे प्राधान्य आणि कर्तव्य असायला हवे.

त्यांनी पुढे म्हटले की, अत्यंत नम्रतेने आणि आदराने सांगावेसे वाटते की, तुकाराम मुंढे यांची बदली होऊ न देणे किंवा त्यांना त्यांच्या विभागातून हटवले जाऊ न देणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राधान्य आणि कर्तव्य असायला हवे.

To put it with humility and respect that it should the priority and Dharm of Honourable CM @Dev_Fadnavis ji to protect Shri @Tukaram_IndIAS that he should not be xfered or shunted out of his department.
🙏🙏🙏
— Paresh Rawal (@SirPareshRawal) August 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

मे २०२६ पासून तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाया

मे २०२६ मध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळ करणाऱ्यांविरोधात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे.

मोठ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सपासून उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनपर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. दूध आणि पनीरमधील भेसळीबाबतही त्यांनी नागरिकांना सावध केले आहे. त्याचप्रमाणे अॅनालॉग पनीरवर महाराष्ट्रात वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं

राज्यातील विविध भागांत भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध आणि भेसळयुक्त मिठाईविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हॉटेलमधील निकृष्ट दर्जाचे अन्न आणि गुटखा विक्रीविरोधातही एफडीएकडून धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा मुद्दा चर्चेत असताना परेश रावल यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरली आहे. आता त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Tukaram mundhe transfer paresh rawal makes a request to cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Bollywood
  • CM Devendra Fadanvis
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
1

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
2

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार
3

Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
4

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.