शूटिंगदरम्यान शहनाज गिलच्या घशात अडकली नोज रिंग (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
शहनाज गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका सीनचे शूटिंग करताना दिसत आहे. या दरम्यान तिची नोज रिंग चुकून घशात अडकल्याचे तिने सांगितले आहे. नोज रिंग घशात अडकल्यानंतर शहनाजला ठसका लागला आणि ती सतत खोकताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, हा धक्कादायक(shocked) प्रकार घडल्यानंतरही शहनाजने शूटिंग थांबवले नाही. तिने अस्वस्थ अवस्थेतही आपला शॉट पूर्ण केला. व्हिडिओमध्ये ती घशातून नोज रिंग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत असून, तिचा सहकलाकार सौरभ सचदेवा तिला मदत करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना शहनाजने शूटिंगदरम्यान घडलेल्या या घटनेबाबत माहिती दिली. एका तीव्र दृश्यादरम्यान तिची नोज रिंग (nose ring) चुकून घशात अडकल्याचे तिने सांगितले. तिने चाहत्यांच्या विनंतीनंतर या घटनेचा पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला आहे.
शहनाजच्या या व्हिडिओनंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. कामापेक्षा आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहनही चाहत्यांनी केले.
View this post on Instagram
दरम्यान, शहनाज गिलच्या वैयक्तिक आयुष्याचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ‘बिग बॉस १३’मध्ये शहनाज गिल आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची मैत्री प्रचंड लोकप्रिय झाली होती. शो संपल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले होते.
आता शहनाजचे नाव अभिनेता आणि डान्सर राघव जुयालसोबत जोडले जात आहे. दोघांनी यापूर्वी डेटिंगच्या चर्चांना नकार दिला असला तरी, राघवच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शहनाजची उपस्थिती आणि दोघांमधील जवळीक पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
पार्टीदरम्यान शहनाज आणि राघव एकमेकांचा हात धरून दिसल्याचेही सांगितले जात आहे. राघवने शहनाजला गाडीत बसण्यासाठी मदत केल्याचेही व्हिडिओ आणि फोटोंमधून समोर आले. त्यामुळे दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दोघांकडून त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.






