Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tumbadchi Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ आता ZEE5 वर! दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी चित्रपटांबद्दल खास भावना केल्या व्यक्त…

Tumbadchi Manjula News: बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर 'तुंबाडची मंजुळा' ७ ऑगस्टला ZEE5 मराठीवर प्रदर्शित होत आहे. पाहा दिग्दर्शक विविध कोरगावकर यांची विशेष मुलाखत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 05, 2026 | 04:20 PM
Tumbadchi Manjula: 'तुंबाडची मंजुळा' आता ZEE5 वर!

Tumbadchi Manjula: 'तुंबाडची मंजुळा' आता ZEE5 वर!

Follow Us
Follow Us:
  • ‘तुंबाडची मंजुळा’ आता ZEE5 वर!
  • दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी चित्रपटांबद्दल खास भावना केल्या व्यक्त…
  • वाचा संपूर्ण बातमी!
Tumbadchi Manjula News: बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्या नंतर “तुंबाडची मंजुळा” ७ ऑगस्टला झी ५ मराठीवर प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शक विविध कोरगांवकर याने खास चित्रपटांबद्दल खास भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रत्येक कथा एका कल्पनेतून सुरू होते. हा चित्रपट करण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली ?

या कथेची पहिली ठिणगी खरंतर झी स्टुडिओजचे भावेश जानवळेकर यांच्याकडून मिळाली. मराठी प्रेक्षकांशी ही संकल्पना खूप घट्ट नातं जोडू शकते, असा त्यांचा विश्वास होता. त्यांची ही दृष्टी माझ्या मनात कायम राहिली आणि ती माझ्या पद्धतीने पुढे घेऊन जावी, असं मला वाटलं. हॉरर-कॉमेडी हा प्रकार मला स्वतःलाही खूप आवडतो, त्यामुळे ही कल्पना मला लगेच भावली. मनोरंजन, आपली संस्कृती आणि अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेलं एक वेगळं विश्व उभं करण्याची उत्सुकता होती.

चित्रपटात लोककथा आणि भयपट यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. ही कथा सांगण्याकडे तुम्ही कसे आकर्षित झालात?

मी कोकणात लहानाचा मोठा झालो. तिथे लहानपणापासून अनेक लोककथा आणि भुतांच्या गोष्टी ऐकत मोठा झालो. त्या कथा माझ्या कल्पनाशक्तीचा एक भाग बनल्या. तुंबाडची मंजुळा बनवताना मला कधीच असं वाटलं नाही की मी काल्पनिक पात्रं घडवत आहे. ही सगळी पात्रं जणू माझ्या ओळखीचीच आहेत, अशी भावना होती. आपल्या संस्कृतीशी, बोलीभाषेशी आणि माणसांशी असलेलं हे नातं चित्रपटाला एक वेगळी अस्सलता देऊन गेलं.

चित्रपटाच्या चित्रीकरणाकडे मागे वळून पाहताना, सेटवरील असा कोणता क्षण आहे जो तुम्ही कायम लक्षात ठेवाल?

खरं सांगायचं तर सेटवरील प्रत्येक दिवस खास होता. प्रत्येक दिवशी नवं आव्हान आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं. पण एक प्रसंग निवडायचा झाला तर तो म्हणजे गुरुजींच्या एंट्रीचा सीन. त्या दृश्यात अनेक कलाकारांना एकत्र सांभाळत त्याची ऊर्जा टिकवणं हे मोठं आव्हान होतं, पण तेवढंच समाधानही मिळालं. दुसरीकडे, “तराट” गाण्याचं चित्रीकरण हा निव्वळ आनंदाचा अनुभव होता. संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक टीमने तो प्रवास मनापासून एन्जॉय केला.

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

प्रत्येक दिग्दर्शकाच्या चित्रपटात त्याचा एक आवडता प्रसंग असतो. तुंबाडची मंजुळा मधील असा कोणता सीन आहे जो मराठी झी ५ वरील प्रेक्षकांनी अनुभवावा, अशी तुम्हाला विशेष उत्सुकता आहे?

मला विशेषतः “देवा मला पाव की रे” हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांनी अनुभवावं, असं वाटतं. ते फक्त एक गाणं नाही, तर चित्रपटाचा भावनिक आत्मा आहे. त्या प्रसंगातील परिस्थिती, कलाकारांचे अभिनय आणि कथा सांगण्याची पद्धत या सगळ्यांचा सुंदर संगम त्यात पाहायला मिळतो. मला विश्वास आहे की हा भाग प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल.

आता तुंबाडची मंजुळा मराठी झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतील, याबद्दल तुम्हाला सर्वात जास्त काय आनंद देतं?

प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतं की प्रेक्षकांनी त्याचा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावा. चित्रपटगृहात जेव्हा एखादा प्रेक्षक दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा चित्रपट पाहायला येतो, तेव्हा त्याहून मोठा आनंद नसतो. आता मराठी झी ५ वर प्रदर्शित झाल्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासोबत, आपल्या वेळेनुसार हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. या चित्रपटासाठी आमच्या संपूर्ण टीमने मनापासून मेहनत घेतली आहे. प्रत्येक वेळी हा चित्रपट पाहताना त्यांना तेवढाच आनंद, भावना आणि थरार अनुभवायला मिळावा, हीच माझी इच्छा आहे.

प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाला काहीतरी शिकवून जातो. तुंबाडची मंजुळाने तुम्हाला दिग्दर्शक म्हणून काय शिकवलं?

या चित्रपटाने मला प्रत्येक पात्राला स्वतंत्र ओळख आणि भावनिक खोली देण्याचं महत्त्व शिकवलं. मुख्य पात्रांइतकीच सहाय्यक पात्रंही कथेचा आत्मा घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, याची जाणीव झाली. दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा माझा विश्वास दृढ झाला की, स्तर असलेली पात्रं आणि प्रामाणिक कथा सांगण्याची शैलीच एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवते.

प्रेक्षकांनी मराठी झी ५ वर तुंबाडची मंजुळा पाहण्यापूर्वी त्यांना तुम्ही एक संदेश द्यायचा झाला, तर तो काय असेल?

माझ्या मते आपल्या प्रत्येकामध्ये एक “मंजुळा” दडलेली असते. ती फक्त चित्रपटातील एक व्यक्तिरेखा नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य, स्वतःचं रक्षण करू न शकणाऱ्यांचं संरक्षण करण्याची ताकद आणि योग्य वेळी आवाज उठवण्याची प्रेरणा आहे. आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला असे प्रसंग येतात, जेव्हा धैर्य, संवेदनशीलता आणि निडरपणा दाखवण्याची गरज असते. तुम्बाडची मंजुळा पाहिल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आतल्या त्या “मंजुळा”ला ओळखावं, अशी माझी इच्छा आहे. हॉरर आणि कॉमेडीच्या पलीकडे हा चित्रपट हेच सांगतो की चांगुलपणा आणि धैर्य या दोन शक्ती कोणताही बदल घडवू शकतात. कधी कधी फक्त आपल्या आतल्या “मंजुळा”ला जागं करणं पुरेसं असतं. प्रेक्षकांनी या प्रवासाचा भरभरून आनंद घ्यावा आणि त्यासोबत ही भावना आपल्या मनात घेऊन जावी, हीच अपेक्षा. “तुंबाडची मंजुळा” बघायला विसरू नका झी ५ मराठीवर !

Zee Marathi: ‘दीपज्योती’ आणि ‘सनई चौघडे’मध्ये भावनिक ट्विस्ट; दीप-ज्योती, जय-शरूच्या नात्यांना मिळणार नवं वळण

Web Title: Tumbadchi manjula zee5 marathi ott release director vividh korgaonkar interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi cinema
  • marathi zee5
  • OTT

संबंधित बातम्या

“हे बदलत चाललंय…” कोकणातील मोठ्या बदलांवर ‘हा’ मराठी अभिनेता झाला भावूक, नेमकं कारण काय?
1

“हे बदलत चाललंय…” कोकणातील मोठ्या बदलांवर ‘हा’ मराठी अभिनेता झाला भावूक, नेमकं कारण काय?

Entertainment News: इच्छा कलशातून रुजली भक्तीची हिरवाई! आषाढी एकादशीला श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम
2

Entertainment News: इच्छा कलशातून रुजली भक्तीची हिरवाई! आषाढी एकादशीला श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घराच्या नावाने वेधलं लक्ष
3

Entertainment News: २९ व्या वर्षी पूर्ण केलं कोट्यवधींचं स्वप्न! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री? घराच्या नावाने वेधलं लक्ष

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हावर टीका करताना कंगनाने ओलांडली का मर्यादा? वक्तव्यामुळे नवा वाद
4

Kangana Ranaut On Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हावर टीका करताना कंगनाने ओलांडली का मर्यादा? वक्तव्यामुळे नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.