Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udta Teer Trailer: कॉमेडी, अ‍ॅक्शन अन् देशभक्तीचा तडका! आयुष्मान खुरानाच्या ‘उडता तीर’चा दुसरा ट्रेलर रिलीज

Udta Teer Trailer: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सारा अली खानच्या ‘उडता तीर’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि देशभक्तीची झलक पाहायला मिळते.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Udta Teer Trailer:  बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या आगामी ‘उडता तीर’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधून कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि मनोरंजनाची धमाकेदार झलक पाहायला मिळत आहे. देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर विनोद आणि अ‍ॅक्शनची अनोखी सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या अनोख्या कथानकाबद्दल बोलताना आयुष्मान खुरानाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘उडता तीर’च्या कथेत प्रत्येक वळणावर नवं सरप्राइज!

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला, “उडता तीरची कथा नेमकी कुठे जाणार आहे, हे समजलंय असं तुम्हाला वाटत असतानाच एक नवं वळण येतं.” या चित्रपटाचा खरा हिरो त्याचा अनोखा विषय असल्याचेही त्याने सांगितले.

देशभक्तीवर आधारित चित्रपट, अ‍ॅक्शनपट आणि कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिले आहेत. मात्र, या तिन्ही प्रकारांची इतक्या वेगळ्या आणि मजेशीर पद्धतीने सांगड घालण्याचा प्रयत्न ‘उडता तीर’मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटात अनेक अनपेक्षित वळणं आणि मनोरंजक प्रसंग पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

या चित्रपटाचं विश्व साकारताना संपूर्ण टीमने खूप मजा केली असल्याचे आयुष्मानने सांगितले. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना प्रेक्षकांनाही त्यातील सरप्राइजेस, धमाल आणि हास्याचा भरपूर आनंद मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा अनोखा मेळ

वेगवेगळ्या जॉनरमधील चित्रपट आणि हटके कथांची निवड करण्यासाठी आयुष्मान खुराना ओळखला जातो. ‘उडता तीर’च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा कॉमेडीकडे वळत आहे. मात्र, यावेळी विनोदासोबत अ‍ॅक्शन आणि देशभक्तीचीही जोड पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये धमाल प्रसंग, कॉमिक गोंधळ आणि अनपेक्षित वळणांची झलक दिसते. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात मनोरंजनाने भरलेला अनुभव देण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.


Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

आयुष्मान-सारासोबत कलाकारांची मोठी फळी

‘उडता तीर’मध्ये आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत मुकुल देव, राम कपूर, रघुबीर यादव, बृजेन्द्र काला, गुलशन ग्रोव्हर, सुहैल नैय्यर, राहुल बोस आणि सुप्रिया पिळगावकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आकाश ए. कौशिक यांनी केले आहे. करण जोहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘उडता तीर’?

कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि देशभक्तीचा अनोखा मेळ असलेला ‘उडता तीर’ हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या ट्रेलरमधून चित्रपटातील धमाल आणि अनपेक्षित वळणांची झलक समोर आल्याने आता प्रेक्षकांना त्याच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.

Vidya Balan: ‘आता AI नेच मुलं जन्माला घाला!’,विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय घडलं?

Web Title: Udta teer trailer ayushmann khurrana sara ali khan comedy action ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana
  • entertainment

संबंधित बातम्या

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
1

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!
2

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा
3

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Vidya Balan: ‘आता AI नेच मुलं जन्माला घाला!’,विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय घडलं?
4

Vidya Balan: ‘आता AI नेच मुलं जन्माला घाला!’,विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.