Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ब्राऊन’च्या शूटिंगदरम्यान काय घडलं? करिश्मा कपूरच्या एका कृतीने दिग्दर्शक अभिनय देव यांचा दृष्टिकोनच बदलला

‘ब्राऊन’च्या शूटिंगदरम्यान करिश्मा कपूर आणि जिशू सेनगुप्ता यांच्या अभिनयाने दिग्दर्शक अभिनय देव प्रभावित झाले. मालिकेचा क्लायमॅक्स प्रेक्षकांसाठी अनपेक्षित आणि भावनिक ठरणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 09, 2026 | 02:04 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या आगामी ‘ब्राऊन’ या प्रोजेक्टमुळे सध्या चर्चेत आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अभिनय देव यांनी नुकत्याच एका मुलाखतीत करिश्माच्या अभिनयाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. विशेष म्हणजे, करिश्माने आपल्या अभिनयाने त्यांना अनेकदा आश्चर्यचकित केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान अभिनय देव यांना विचारण्यात आलं की, सेटवर असा एखादा क्षण होता का, जेव्हा एखाद्या कलाकाराने त्यांना इतकं प्रभावित केलं की एखाद्या दृश्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, त्यांच्या दिग्दर्शनाची प्रक्रिया नेहमीच सहकार्यपूर्ण असते.

“कलाकार पटकथेतून प्रेरणा घेतात आणि मी त्यांच्या अभिनयातून प्रेरणा घेतो. या सेटवर आम्ही सतत एकमेकांना प्रेरित करत होतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया खूप नैसर्गिक आणि रोमांचक झाली,” असं अभिनय देव म्हणाले.

मात्र, सर्व कलाकारांमध्ये करिश्मा कपूरने त्यांना सर्वाधिक प्रभावित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “करिश्मा तिच्या कम्फर्ट झोनच्या पूर्णपणे बाहेर जाऊन पात्रात इतकी समरस झाली होती की तिचे काही परफॉर्मन्स पाहून मी अक्षरशः थक्क झालो. ती सेटवर एका क्षणी सर्वांसोबत हसत-खेळत असायची आणि ‘ॲक्शन’ म्हटल्याबरोबर पूर्णपणे त्या पात्रात रूपांतरित व्हायची. कलाकारांमधील ही गोष्ट मला नेहमीच आश्चर्यचकित करते आणि करिश्माने ते वारंवार सिद्ध करून दाखवलं,” असं त्यांनी सांगितलं.

करिश्मा कपूरप्रमाणेच इतर कलाकारांनीही त्यांना अनेकदा आश्चर्यचकित केल्याचे अभिनय देव यांनी सांगितले. विशेषतः अभिनेता जिशू सेनगुप्ता याच्या अभिनयाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. “जिशूने अत्यंत सूक्ष्म अभिनय करत केवळ डोळ्यांमधून आणि छोट्या-छोट्या हावभावांतून अनेक भावना व्यक्त केल्या. प्रत्येक कलाकाराने वेगवेगळ्या क्षणी मला आश्चर्यचकित केलं आणि त्यामुळेच हा अनुभव खास ठरला,” असे ते म्हणाले.

मालिकेतील सर्वात आव्हानात्मक भाग कोणता होता, याबद्दल बोलताना अभिनय देव यांनी क्लायमॅक्सचा विशेष उल्लेख केला. “अंतिम मसुद्यावर पोहोचण्याआधी आम्ही जवळपास आठ महिने चर्चा आणि विचारमंथन केलं. इतकंच नाही, तर ज्या दिवशी क्लायमॅक्सचं शूटिंग केलं, त्यादिवशीही त्यात सुधारणा सुरू होत्या. हा पारंपरिक क्लायमॅक्स नव्हता, त्यामुळे त्याला योग्य स्वरूप देणं मोठं आव्हान होतं,” असे त्यांनी सांगितले.

क्लायमॅक्सबाबत बोलताना त्यांनी लेखक मायूर आणि संपूर्ण क्रिएटिव्ह टीमचे आभार मानले. “ऋतिका, आशिमा आणि संपूर्ण टीमने या दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. हा क्लायमॅक्स अनपेक्षित, भावनिकदृष्ट्या खोल आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. जसा आम्हाला तो बनवताना आश्चर्याचा धक्का बसला, तसाच अनुभव प्रेक्षकांनाही येईल अशी आशा आहे,” असे ते म्हणाले.

Sayaji Shinde Emotional Story : आईला दिलेलं वचन, 6.5 लाख झाडांमध्ये फुललं; आईसाठी सयाजी शिंदेंचा अनोखा संकल्प, भावुक पोस्ट चर्चेत

दरम्यान, मालिकेचे चित्रीकरण कोलकात्यात करण्यात आले असून, त्या शहराने कथानकाला वेगळीच ऊर्जा दिल्याचेही अभिनय देव यांनी नमूद केले. एप्रिल महिन्यातील 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात शूटिंग करणे आव्हानात्मक होते, मात्र त्या उष्णतेचा प्रभाव मालिकेच्या वातावरणात नैसर्गिकपणे दिसून आला.

“कोलकात्याच्या गल्लीबोळांपासून ते वास्तुकलेपर्यंत आणि सांस्कृतिक वैविध्यापासून खाद्यसंस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीने मालिकेला वेगळी ओळख दिली. इतक्या उकाड्यातही आम्ही तिथल्या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. खरं तर शूटिंग संपेपर्यंत माझं पाच-सहा किलो वजन वाढलं होतं,” असे त्यांनी हसत सांगितले.कलाकारांचा प्रभावी अभिनय, वेगळा क्लायमॅक्स आणि कोलकात्याचं वास्तवदर्शी वातावरण यामुळे ‘ब्राऊन’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Eetha Release Date: श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’ची प्रतीक्षा संपली; रिलीज डेट आली समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपटगृहांत प्रदर्शित

Web Title: What happened during the shoot of brown karisma kapoors one act changed director abhinay deos perspective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • karisma kapoor

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
3

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.