(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Yeh Prem Mol Liya: बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटात शर्वरीसोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईतील ऐतिहासिक रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये पार पडला. चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात याच खास ठिकाणाहून करण्याचा निर्णय शर्वरीसाठी भावनिक आणि खास ठरला.
म्युझिक लॉन्च सोहळ्यातील काही खास फोटो आणि व्हिडीओ शर्वरीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने रॉयल ऑपेरा हाऊसचं महत्त्व सांगत चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात करण्यासाठी हे ठिकाण योग्य असल्याचं म्हटलं.
शर्वरीने लिहिलं, “रॉयल ऑपेरा हाऊस, जिथे पिढ्यान्पिढ्या कुटुंबं एकत्र येऊन कथा, गाणी आणि चित्रपटांना जिवंत होताना पाहत आली आहेत. सूरज बडजात्यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’च्या प्रमोशनची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर जागा कोणती असू शकते!”
‘ये प्रेम मोल लिया’ हा शर्वरीचा सूरज बडजात्या आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबतचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च तिच्यासाठी आणखी खास ठरला.
भावना, कुटुंब आणि संगीत याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत सोहळ्यासाठी ऐतिहासिक रॉयल ऑपेरा हाऊसची निवड करण्यात आली. हा खास क्षण आपल्या हृदयाच्या अगदी जवळ जपून ठेवणार असल्याचंही शर्वरीने म्हटलं आहे.
२७ नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज
सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘ये प्रेम मोल लिया’मध्ये आयुष्मान खुराना आणि शर्वरी प्रमुख भूमिकेत आहेत. कुटुंब, प्रेम आणि भावनांवर आधारित या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






