Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”तू, मी आणि देऊळ बंद 2….”, Pravin Tarde यांच्या पत्नीची भावनिक पोस्ट चर्चेत! म्हणाल्या, ”स्वामींनी आपल्याला…”

अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून या पोस्टसह ‘देऊळ बंद २’च्या चित्रीकरणादरम्यानचे काही गोड फोटोही शेअर केले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: May 28, 2026 | 03:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रविण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची हा बहुचर्चित मराठी चित्रपट २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ३.०५ कोटींची कमाई केली तर पुण्यातील अनेक शो हे हाऊसफुल झाल्याची माहिती आहे. चित्रपटाची क्रेझ सध्या इतकी वाढली आहे की सकाळच्या शोला देखील प्रक्षकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली. या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर २८.२७ कोटींचा गल्ला जमावला आहे. सध्या सर्वत्र देऊळ बंद २ चे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत. या चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे आणि मोहन जोशींची प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे.

चित्रपटाला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी शूटिंगवेळीचे काही क्षण त्यांनी पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये प्रवणी तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांचे सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. ”तू, मी आणि देऊळ बंद २!” असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.

स्नेहल तरडे यांची भावनिक पोस्ट
स्नेहल तरडे यांनी लिहिले, ”आज 1 आठवडा झाला चित्रपट प्रदर्शित होऊन. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे. तू आणि मी.. एकाच कलेच्या प्रेमात असणारी दोन माणसं! स्वामींनी आपल्याला एकत्र आणलं त्यात आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि आपलं आपल्या कलेवर असलेलं प्रेम, या दोन्ही गोष्टींची गुंफण घालून काहीतरी वेगळं साध्य करुन घ्यायचं होतं त्यांना हे आता कळतंय.. आपलं निमित्त करुन अनेक सामाजिक प्रश्न, शेतकर्‍यांच्या समस्या, देवावर वाढत असलेली अश्रद्धा अशा अनेक गोष्टी अधोरेखित करुन त्यावरचे उपाय समाजाला सांगायचे होते स्वामींना..”

त्याने पुढे लिहिले, चित्रपटातून मिळणारा नफा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणावर खर्च करण्याची बुद्धी देऊन, त्यांच्या स्त्रियांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मदत करायची होती स्वामींना.. योग्य वेळ साधून सगळंकाही घडवून आणलं त्यांनी! त्यांच्या या एवढ्या मोठ्या कृपेचे आपण पात्र ठरलो आहोत हे आपले केवढे मोठे भाग्य म्हणायचे!! स्वामी महाराज, तुमची अशीच कृपा जन्मोजन्मी आमच्या भाग्यात येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना! श्री स्वामी समर्थ महाराज की जय ” अशी भावनिक पोस्ट करत अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत..


चित्रपटाची कथा

दरम्यान ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट श्रद्धेविरुद्ध विज्ञान या संकल्पनेवर बनवण्यात आला आहे. पहिल्या भागातही संकल्पना अशीच होती ज्यात आपल्याला श्रद्धेपुढे विज्ञान हरल्याचे दिसले. पण आता परिक्षा देवाची या पुढच्या भागात नक्की विजय कुणाचा हे पाहणं मनोरंजक ठरेल. कलाकारांनी या चित्रपटात भरपूर मेहनत घेतली आहे आणि याच मेहनतीचे फळ आपल्याला चित्रपटाच्या प्रसिद्धीतून दिसून येते. चित्रपट ११ वर्षांपूर्वी आलेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यात भक्ती, विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम पाहायला मिळेल

 

Web Title: You me and deool band 2 pravin tardes wifes emotional post goes viral she says swami brought us together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • marathi movie
  • pravin tarade
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित
1

पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध घेणार “अडकित्ता”! मराठी झी ५ वर लवकरच होणार प्रदर्शित

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच;  चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज
2

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Psycho Ranga Movie: रहस्य, थरार अन् दमदार कलाकारांचा मेळ; ‘सायको रंगा’चा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?
4

Dwidha Movie Review: दोन पिढ्यांचं अंतर, वचनाची परीक्षा अन् भावनांचा गुंता; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’ चित्रपट कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.