Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठंमोठे सेलेब्रिटीही आहारात करतात ABC ज्यूसचा समावेश; त्वचेच्या अनेक समस्या करते दूर; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

ABC Juice Benefits: पोषक तत्वांनी समृद्ध गाजर, बीट आणि आवळ्याचा रस सध्या फार ट्रेंडमध्ये आहे. हा रस शरीरासाठी अमृताहून कमी नाही. याचे नियमित सेवन आरोग्याच्या अनेक समस्या दूर करून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 17, 2025 | 08:15 PM
मोठंमोठे सेलेब्रिटीही आहारात करतात ABC ज्यूसचा समावेश; त्वचेच्या अनेक समस्या करते दूर; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

मोठंमोठे सेलेब्रिटीही आहारात करतात ABC ज्यूसचा समावेश; त्वचेच्या अनेक समस्या करते दूर; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही काळापासून एबीसी ज्यूसचा ट्रेंड फार वाढत आहे. मोठमोठ्या सेलेब्रिटींपासून ते आरोग्य तज्ञांपर्यंत सर्वच या ज्यूसचे सेवन करण्याचा सल्ला करतात. हे एक आरोग्यदायी पेय असून गाजर, बीट आणि आवळ्यापासून ते तयार केले जाते. भाज्यांचे हे रस आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. गाजर, बिट आणि आवळा यांना एकत्रितपणे पिणे शरीरासाठी एक प्रकारचा नैसर्गिक टॉनिकप्रमाणेच आहे. या तिघांचे मिश्रण केवळ चवीलाच चांगलं नसून, आरोग्यदृष्ट्याही अत्यंत लाभदायक असतं. गाजरात बीटा-कॅरोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के हे घटक भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यात, त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.

आंब्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं! जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ

बीटरूटमध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि नायट्रेट्स असतात, जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि थकवा कमी करतात. बीटरूटचा रस विशेषतः हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो. बीटरूटचे नियमितपणे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो आणि उर्जा पातळी वाढते. आवळा हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तो व्हिटॅमिन सी चा अत्यंत समृद्ध स्रोत असून, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. आवळ्याचे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना नुकसानीपासून वाचवतात आणि पचनतंत्र मजबूत करतात.

ABC ज्यूसचे फायदे आणि तयार करण्याची योग्य पद्धत

गाजर, बीट आणि आवळा यांचा एकत्रित रस तयार केल्यास तो एक अत्यंत प्रभावी आरोग्यदायी पेय ठरतो. या रसामध्ये असलेले पोषक घटक शरीरातील विविध आवश्यक कार्यांसाठी मदत करतात. यामध्ये हाडं मजबूत होणे, त्वचा तजेलदार दिसणे, केसांची वाढ सुधारणे आणि शरीराला ऊर्जा मिळणे यांसारख्या अनेक फायदे मिळतात. या रसाचं नियमित सेवन केल्यास थकवा कमी होतो, शरीरात ताजेपणा येतो आणि एकूणच आरोग्यदृष्ट्या सुधारणा होते.

हा रस तयार करणे फार सोपे आहे. यासाठी प्रथम गाजर, बीटरूट आणि आवळा यांना चांगलं धुऊन, सोलून आणि लहान तुकडे करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यावं. तयार ज्यूस गाळू नका आणि तसेच याचे सेवन करा. तुम्ही यात तुम्हाला हवे असल्यास लिंबाचा रस किंवा मधही घालू शकता. दररोज सकाळी उपाशी पोटी हा रस प्यायल्यास शरीरासाठी तो अमृतासमान ठरतो. त्यामुळे या नैसर्गिक पेयाचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करून आरोग्य लाभ घेणं नक्कीच फायद्याचे ठरेल.

‘या’ व्यक्तींनी आहारात चुकूनही करू नका कडुलिंबाच्या पानांचे सेवन! शरीरात होतील भयानक बदल, पचनावर होईल परिणाम

त्वचेचे आरोग्य सुधारते

बीटमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट नावाचे गुणधर्म असतात जे शरीरातील आतड्यांचे आरोग्य सुधारते. गाजर, आवळा आणि बीटाचे एकत्रित सेवन केल्यास शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि वाईट बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. या रसाचे नियमितपणे सेवन केलयास आतड्याचे आरोग्य सुधारते, परिणामी त्वचेवरही नैसार्गिक निखार जाणवू लागतो. या भाज्यांमध्ये आढळणारे घटक त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. या रसाचे सेवन संसर्गापासून देखील आपले संरक्षण करतो. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो, ज्यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Abc juice is highly beneficial for skin and health many celebrities drink it in their daily routine lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • best fruit juices
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल
1

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
2

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

थंडीत आखडतात शरीरातील 100 पेक्षा अधिक सांधे, 5 सोपी कामं जे त्रासापासून ठेवतील दूर
3

थंडीत आखडतात शरीरातील 100 पेक्षा अधिक सांधे, 5 सोपी कामं जे त्रासापासून ठेवतील दूर

Screen Time Obesity: मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याला कारणीभूत ठरतोय ‘हा’ डिव्हाईस, पालकांना दिला बालरोगतज्ज्ञांनी इशारा
4

Screen Time Obesity: मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याला कारणीभूत ठरतोय ‘हा’ डिव्हाईस, पालकांना दिला बालरोगतज्ज्ञांनी इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.