जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ
मार्च, एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणवर कच्च्या कैऱ्या आणि आंबे उपलब्ध असतात. आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला खाल्ला जाणारा आंबा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. एप्रिल महिन्यात आंबे पिकू लागतात. कोकणात मिळणारे अस्सल हापूस आंब्याची चव खूप जास्त वेगळी आहे. आंब्याच्या आतील गराचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. जगभरात क्वचितच असा कोणी एखादा असेल ज्याला आंबा खायला आवडत नाही. आंबा हे फळ अनेकांच्या सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंब्याचे लोणचे, आमरस, आंबा बर्फी, आंबा मिल्क शेक असे आंब्यापासून नानाविध पदार्थ तयार केले जातात आणि चवीने खाल्ले जातात.(फोटो सौजन्य – iStock)
महिनाभरात वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ पिवळ्या पाण्याचे सेवन, पोटावरील चरबी होईल कमी
घरी असल्यानंतर अनेक लोक कोणत्याही वेळी आंब्याचे सेवन करतात. पण संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारी आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पचनसंस्था बिघडते आणि आंबा खाण्याची पुन्हा एकदा इच्छा होत नाही. आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर आहे. कारण रात्री आंबा खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारण सांगण्यात येते. तुम्ही रात्री जेवल्यावर आंबा खाल्लात तर अतिसार, उलट्या होऊ शकतात, यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळावे.
बीटा-कॅरोटीन आंबा हा बीटा कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे, बीटा कॅरोटीनमुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.विटामिन सी आणि विटामिन ए आंब्यामध्ये विटामिन सी आणि विटामिन ए हे पोषक घटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आंब्यामध्ये मॅगिफेरिन नावाचे ऍटी-ऑक्सिडंट असते, ज्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. मॅगिफेरिन पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मदत करते. आंबा हा पोटॅशियमचा एक स्रोत आहे, जो हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, ज्यामुळे हृदयरोगाच धोका कमी होतो.आंबे फायबरसमृद्ध आहेत. फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या टाळण्यास मदत होते.
तुम्ही सुद्धा केमिकल असणारा आंबा खाताय का? ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा खरा हापूस !
जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन किलयुगामुळे शरीरात उष्णता आणखीनच वाढू लागते. शरीरात वाढलेली उष्नत्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. याशिवाय आंबा खाल्यामुळे त्वचेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. याशिवाय आंबा पचनासाठी हलका असाला तरीसुद्धा आंबे खाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात.