Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Pollution : आता श्वास घेणंही धोकादायक? ‘प्रदूषित हवा ठरतेय सायलेंट किलर’ ; WHO गंभीर इशारा

Air Pollution : वाढत्या वायूप्रदूषणामुळे सार्वजिनक आरोग्यसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जगभरात २०२३ मध्ये वायुप्रदूषणामुळे तब्बल ७९ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर WHO कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 04:47 PM
Air Pollution

Air Pollution

Follow Us
Follow Us:
  • असंसर्गजन्य आजारांचे वाढते ओझे
  • हवामान बदलामुळे संकट अधिक गडद
  • २०४० पर्यंत मृत्यू निम्म्यावर आणण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष्य
सुनयना सोनवणे : Air Pollution : वायुप्रदूषण ही आता केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर जागतिक सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक बनली आहे. जगभरात २०२३ मध्ये वायुप्रदूषणामुळे तब्बल ७९ लाख लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ८६ टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजारांशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५’ अहवालातून समोर आली आहे. वाढते प्रदूषण, वृद्ध होत जाणारी लोकसंख्या आणि हवामान बदल यामुळे हे संकट आगामी काळात आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

No Tobacco Day: बदलत्या काळातील नवीन संकट ‘Vaping’ आणि ‘Nicotine Pouches’; तंबाखू कंपन्यांच्या जाहिरातींमागेही काळे सत्य

वायुप्रदुषणामुळे होणारे आजार

हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन आणि एनसीडी अलायन्स यांच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे झालेल्या ७९ लाख मृत्यूंपैकी ६८ लाख मृत्यू हृदयविकार, सीओपीडी, मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, कर्करोग आणि डिमेन्शिया यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे झाले आहेत. विशेषतः ६० वर्षांवरील व्यक्तींमधील ९५ टक्के प्रदूषणजन्य मृत्यू या आजारांशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मृत्यूदरात वाढ

वायुप्रदूषणामुळे २०२३ मध्ये जगभरातील नागरिकांची १६.१ कोटी निरोगी आयुष्याची वर्षे गमावली गेली. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण, रुग्णालयांतील गर्दी, उत्पादकतेतील घट आणि आर्थिक नुकसान वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या अहवालात प्रथमच डिमेन्शिया आणि वायुप्रदूषण यांच्यातील संबंधाचा समावेश करण्यात आला असून, या कारणामुळे ६.२५ लाखांहून अधिक मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने २०४० पर्यंत मानवनिर्मित वायुप्रदूषणामुळे होणारे मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

जगातील ३६ टक्के लोकसंख्या धोकादायक पीएम २.५ (सूक्ष्म कण) प्रदूषणाच्या संपर्कात असून जवळपास २.६ अब्ज लोक घरगुती घन इंधनांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करत आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या संकटाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात हवामान बदलाचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटा, जंगलातील आगी आणि ओझोन प्रदूषणामुळे श्वसनविकार व हृदयविकारांचा धोका अधिक वाढत आहे. स्वच्छ ऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि प्रभावी धोरणे यांची अंमलबजावणी केल्यास लाखो जीव वाचविणे शक्य होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अहवालातील ठळक निष्कर्ष

  • २०२३ मध्ये वायुप्रदूषणामुळे ७९ लाख मृत्यू
  • ६८ लाख (८६%) मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे
  • १६.१ कोटी निरोगी आयुष्याची वर्षे गमावली
  • ६.२५ लाख मृत्यू वायुप्रदूषणाशी संबंधित डिमेन्शियामुळे
  • जगातील ३६% लोकसंख्या धोकादायक पीएम २.५ प्रदूषणाच्या संपर्कात
  • २.६ अब्ज लोक घरगुती घन इंधनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यात
  • ६० वर्षांवरील व्यक्तींमधील ९५% प्रदूषणजन्य मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे
  • जागतिक आरोग्य संघटनेचे लक्ष्य : २०४० पर्यंत प्रदूषणजन्य मृत्यू ५०% ने कमी करणे
श्वसनविकार तज्ञ डॉ. अभिजित कोरे सांगतात, ‘पीएम २.५ सारखे सूक्ष्म प्रदूषक फुफ्फुसांपर्यंतच मर्यादित राहत नाहीत, तर ते रक्तप्रवाहात मिसळून हृदय, मेंदू आणि इतर अवयवांवर परिणाम करतात. त्यामुळे प्रदूषणाचे परिणाम केवळ श्वसनविकारांपुरते मर्यादित नसतात.’

World Parrot Day: निसर्गाचा सर्वात सुंदर आणि बुद्धिमान मित्र धोक्यात; पोपटांचे अस्तित्व वाचवण्यासाठी आपण कधी होणार जागरूक?

Web Title: Air pollution helath crisis silent killer who alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Air Pollution
  • Health News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.