फोटो सौजन्य - Social Media
बहुतेक जणांना असे वाटते कि सेवनात साखरेचे प्रमाण जास्त असेल किंवा गोडाधोडाचे जास्त खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते. परिणामी, व्यक्ती डायबिटीजसारख्या आजाराचा आयुष्यभर सोबती होतो. गोड खाण्यावर नियंत्रण हे ठेवलेच पाहिजे परंतु असे गृहीत धरणे कि फक्त गोड ही चवच मधुमेहाला कारणीभूत ठरते, हे फार चुकीचे आहे. असे अनेक व्यक्ती आहेत, जे भरपूर प्रमाणामध्ये गोड खात असतात. सतत त्यांच्या जेवणामध्ये गोडाधोडाचे खाद्यपदार्थ असतात. परंतु, या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यसावर काही परिणाम होत नाही. गोड खाऊनही त्यांना डायबिटीज होत नाही. महत्वाचे म्हणजे काही उदाहरणे अशी देखील आहेत कि कमी गोड किंवा काहीच गोड न खाता देखील मधुमेहाचा आजार होतो.
हे देखील वाचा : एक थेंबही तेल न वापरता बनवा परफेक्ट भटुरे, वेट लॉससाठी उत्तम रेसिपी
बहुतेक आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे कि मधुमेहाचा संबंध व्यक्तीच्या गोड खाण्याशी नसतो. शरीराला मधुमेहीची लागण शरीरातील इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होते. याला इन्सुलिन रेजिस्टन्स कारणीभूत असते. परंतु, याचा अर्थ असा नाही कि सतत गोड खाणे सुरु ठेवावे. कोणत्याही गोष्टी मायदेत केले तरच त्या चांगल्या असतात, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांनी गोड खाणे कमीच ठेवावे. त्याचबरोबर इतर खाद्य पदार्थांच्या सेवनातही मर्यादा ठेवाव्यात.
सेवनात मीठाचे प्रमाण म्हणजेच सोडिअमचे परिमाण फार असणे शरीरासाठी नुकसानदायक असू शकते. याने ब्लड प्रेहसार वाढण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते आणि डायबिटीजचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जास्त मीठ असलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावे. फक्त डायबिटीजचे रुग्ण नव्हे तर प्रत्येकाने मीठाचे जास्त प्रमाण असलेले खाद्यप[पदार्थ खाणे टाळावे. मधुमेहाचा आजार असणाऱ्या लोकांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मैदा. मैदापासून बनलेले पदार्थ न खाल्ले तरच उत्तम असते. मैदा शरीरामध्ये जाऊन ग्लुकोजचा अवतारात येतो आणि शरीरातील साखरेच्या वाढीस बहुमूल्य योगदान देतो. त्यामुळे मैदा खाणे टाळावेच.
हे देखील वाचा : मेकअप न करता सुंदर दिसायचं असेल तर ‘हे’ उपाय नक्की करून पहा, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक
मधुमेहाचा आहार असणाऱ्या व्यक्तींनी मद्यपानापासून चार हाताचे अंतर ठेवावे. दारू शरीरात जाऊन ग्लुकोज मोठ्या प्रमाणामध्ये कमी करते आणि परिणामी भयंकर परिस्थिती उद्भवू शकते. त्याचबरोबर तळलेले खाद्यपदार्थ, हाई ग्लाइसेमिक इंडेक्स असलेले फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी भयंकर ठरू शकते, त्यामुळे या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळावे.