मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच महिला आणि मुलींना मेकअप करायला खूप आवडतो. मेकअप केल्यानंतर महिलांच्या सौंदर्यत वाढ होते. अनेक महिला सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी सतत मेकअप आणि बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करत असतात. पण या सर्व गोष्टींमुळे चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो हळूहळू कमी होऊ लागतो. मेकअप करताना अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. तसेच तासनतास आरशासमोर उभा राहून मेकअप केला जातो. असे केल्यामुळे चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य कमी होऊन त्वचा निस्तेज आणि खराब दिसू लागते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मेकअप केला जातो, मात्र अनेकदा यामुळेच त्वचा जास्त खराब होण्याची शक्यता असते.
मेकअप केल्यानंतर त्वचा सुंदर दिसते, मात्र त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य कमी होऊन जाते. चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी मेकअप न करता आहारात बदल करून त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेची चमक वाढवण्यासाठी स्किन केअरमध्ये बदल करून त्वचेचा ग्लो पुन्हा परत मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला त्वचेचा हरवलेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर तुमची त्वचा सुंदर आणि छान दिसेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: किचनमधील या काळ्या पदार्थातील ‘कॅप्साईसिन’ वाढवतो पुरुषांमधील स्टॅमिना, नियमित करा सेवन
त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी पौष्टीक अन्नपदार्थांचे सेवन करावे, जे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. आहारात प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच बीटरूट ज्युस, फळांचा रस, नारळ पाणी इत्यादींचे सेवन करावे. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसेल.
मेकअप करून त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापेक्षा त्वचेची काळजी घेऊन त्वचेची चमक वाढवता येते. तसेच त्वचेच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. आठवड्यातून एकदा त्वचा स्क्रब करावी. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल. स्क्रब बनवण्यासाठी १ चमचा ओट्समध्ये अर्धा चमचा चंदन पावडर, टोमॅटोचा पल्प, कच्ची हळद आणि दही मिक्स करून त्वचेवर लावा. त्यानंतर तेलाने चोळून त्वचा स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास त्वचा गोरीपान होईल.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेवर पिंपल्स, मुरूम, फोड येण्यास सुरुवात होते. त्यामुळे चेहऱ्यावर आलेले फोड किंवा पिंपल्स घालवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचेमधील घाण निघून जाऊन चेहरा पिंपल्स आणि डाग विरहित होतो. मानसिक आणि शारीरिक तणाव निर्माण झाल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
हे देखील वाचा: उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? मग एक चमचा बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
मेकअप न करता सुंदर दिसायचे असेल तर स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझरचा वापर करावा. मॉइश्चरायझरचा वापर केल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते. फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेवर टोनर लावून नंतर वरून सीरम आणि मॉइश्चरायझर लावा. हे नियमित केल्यास त्वचेचा रंग बदलून चेहरा सुंदर आणि चमकदार दिसेल.