Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओरडून ओरडून शरीराची ही लक्षणे देत असतात गंभीर आजराचा इशारा, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

आपण निरोगी असो वा आजारी, प्रत्येक परिस्थितीत आपले शरीर आपल्या आरोग्याचे रहस्य सांगत असते. साधारणपणे, जेव्हा आपल्या शरीरात काही गंभीर आजार असतात तेव्हा आपले शरीर काही संकेत देत असते ज्याच्या मदतीने वेळेत आजार ओळखता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 07, 2024 | 06:00 AM
ओरडून ओरडून शरीराची ही लक्षणे देत असतात गंभीर आजराचा इशारा, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

ओरडून ओरडून शरीराची ही लक्षणे देत असतात गंभीर आजराचा इशारा, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

Follow Us
Follow Us:

आपल्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असती. ज्याप्रमाणे आपण निरोगी असताना आपले शरीर निरोगी दिसते, त्याचप्रमाणे शरीरात काही समस्या किंवा रोग आल्यावर शरीर याचे सिग्नल देऊ लागते. आपले शरीर अनेकदा काही लक्षणांद्वारे आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या आत काही गंभीर आजार विकसित होत आहेत. तथापि, ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की त्यांच्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते आणि यामुळे, गंभीर रोग शोधण्यात बराच विलंब होतो.

अशा परिस्थितीत, लोकांना या लक्षणांबद्दल जागरूक करण्यासाठी, डॉ. सौरभ सेठी यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अशा काही आजाराचा लक्षणांबद्दल सांगितले, जे शरीरात विकसित होत असलेल्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकतात. चला तर मग हे नक्की या लक्षणांविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – दंडांवरील अतिरिक्त चरबीमुळे हाथ थुलथुलीत-जाडसर दिसतायेत? मग या ट्रीक्सचा वापर करा, क्षणार्धात चरबी जाईल वितळून

छातीत दुखणे

तुम्हाला वारंवार किंवा सतत छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. विशेषत: छातीत होत असलेल्या वेदना, ज्या लेफ्ट आर्मपर्यंत जाणवू लागतात, या वेदना हार्ट अटॅकचा इशारा देत असतात.

बोलण्यात अडचणी येणे

जर तुम्हाला अचानक बोलण्यात अचानक अडचण येऊ लागत असतील किंवा तुमचे शब्द अस्पष्ट होऊ लागले तर चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला बोलण्यात अडचण येत असल्यास किंवा तुमच्या चेहऱ्याची एक बाजू निस्तेज दिसत असल्यास, हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते.

मूत्र किंवा मल मध्ये रक्त

जर तुम्हाला तुमच्या लघवीमध्ये किंवा स्टूलमध्ये रक्त दिसले तर ते गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. लघवी किंवा स्टूलमध्ये रक्त येणे म्हणजे तुमच्या कोलन किंवा किडनीमध्ये गंभीर समस्या असू शकते.

हेदेखील वाचा – शालिनी पासी सकाळी उपाशी पोटी करते या पदार्थाचे सेवन, फायदे ऐकून दंग व्हाल

ओटीपोटात तीव्र वेदना होणे

बऱ्याच लोकांना ओटीपोटात तीव्र वेदना जाणवतात, परंतु लोक सहसा ते सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि, ओटीपोटात तीव्र वेदना होणे नेहमीच सामान्य नसते आणि ते अपेंडिसाइटिस आणि मूत्रपिंड किंवा गॉल ब्लेडरमधील स्टोनचे लक्षण असू शकते.

अचानक वजन कमी होणे

आजकाल बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी कठोर परिश्रम देखील करतात. तथापि, जर तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होत असेल तर याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अचानक वजन कमी होणे हे सामान्य नाही आणि हे गंभीर आरोग्याचे लक्षण असू शकते.

खोकल्यात रक्तस्त्राव होणे

तुम्हाला तुमच्या खोकल्यामध्ये रक्त दिसल्यास, विलंब न करता तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. खोकल्यापासून रक्त येणे हे फुफ्फुसाच्या खराब संसर्गाचे किंवा इतर आजाराचे लक्षण असू शकते.

दृष्टी कमी होणे

खराब दृष्टी किंवा दृष्टी पूर्णपणे कमी होणे देखील एक गंभीर आजराचे लक्षण असू शकते. अचानक झालेले व्हिजन लॉस डिटेच रेटिनाचा संकेत देत असतात. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर अजिबात विलंब करू नका आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Health these warning signs could indicate serious health dont ignore them if you value your life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • health issues
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
3

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.