बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात देखील अनेक बदल झाले आहेत. आता बहुतेक लोक कामाच्या गडबडीत घरी फारसे जेवण बनवत नाहीत आणि बाहेरचे घाऊक आणि तेलकट असे अनहेल्दी पदार्थांवर अधिक जोर देतात. मात्र हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फार घातक ठरत असतात. आपल्या रोजच्या आहारात शक्यतो अनहेल्दी पदार्थांचा अधिक समावेश करू नये, यामुळे लठ्ठपणा सहित अनेक आजार होण्याची शक्यता असते. लठ्ठपणा हा एक असा आजार आहे जो बहुतेक लोकांमध्ये वाढत चालला आहे. ‘
आरोग्याच्या दृष्टीने आपले वजन अधिक वाढणे काही चांगली गोष्ट नाही, यामुळे आपल्याला बरेच आजार होऊ शकतात. तसेच याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर देखील होत असतो. आता बहुतेकदा आपण आपल्या पोटाची चरबी तर डाएटिंग कमी करतो मात्र आपले थुलथुलीत आणि जाडसर झालेले दंड काही आपल्याला कमी करता येत नाहीत. यामुळे, तुम्हाला स्लीव्हलेस कपडे घालणे चांगले वाटत नाही त्यामध्ये तुम्ही फिट दिसत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही नियमितपणे काही योगासने केली तर अवघ्या काही दिवसांतच तुमच्या दंडांवरची अतिरिक्त चरबी कमी करू शकता.
हेदेखील वाचा – शालिनी पासी सकाळी उपाशी पोटी करते या पदार्थाचे सेवन, फायदे ऐकून दंग व्हाल
सीटिंग क्रंच
तुमच्या पाठीवर झोपा, तुमचे पाय जमिनीवर घट्टपणे आणि गुडघे 90-अंश कोनात वाकून, आणि तुमच्या मानेला आधार देण्यासाठी तुमचे हात तुमच्या डोक्याच्या मागे ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, नंतर श्वास सोडा आणि तुमचे डोके आणि खांदे जमिनीवरून वर खाली करत राहा. या व्यायामामुळे पोटाची चरबी निश्चितच कमी होण्यास मदत होईल. हा व्यायाम नियमितपणे 15-20 मिनिटे करा.
बटरफ्लाय पोज
बटरफ्लाय पोज हे आसन चरबी कमी करण्यासाठी ओळखले जाते. यामुळे तणावही कमी होतो. यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर बसावे लागेल. आरामशीर मुद्रेत बसा आणि दोन्ही पाय आरामात उघडा. यानंतर दोन्ही पाय पसरून दोन्ही तळवे जोडा. यावेळी फक्त तुमचे तळवे जमिनीला स्पर्श करत आहेत आणि तुमच्या पायाचा संपूर्ण भाग थोडा वर यायला हवा. असे केल्यावर ही पोज हुबेहूब फुलपाखरासारखी दिसू लागते. आता पायाच्या बोटांना हाताने पकडा आणि मांड्या वर खाली करत रहा. चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे.
हेदेखील वाचा – चांदीचे पैंजण काळे पडलेत? मग आता चिंता सोडा, या ट्रिकच्या मदतीने घरीच हिऱ्यासारखे चमकवा पैंजण
पुरेसे पाणी
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास चरबी वितळत नाही. तसेच शरीरात पाण्याची कमतरता असल्यास बद्धकोष्ठता आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. यामुळे मेटाबॉलिजम देखील मंदावतो, ज्यामुळे उलटे वजन वाढू लागते. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पुरेसे पाणी पीत रहा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.