
फोटो सौजन्य सोशल मिडिया
मखाना ही एक पाण्यात उगवणारी वनस्पती आहे. या फळाला मखानाच्या बिया येतात.भारत – जपान आणि चिन सारख्या देशात मखाना चे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. भारतात बिहार राज्यात मखाना बियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
मखाना मध्ये कमी प्रमाणात कॅलरिज असते, पण फायबरचे प्रमाण जास्त असते. मखाना खाल्यामुळे पोट भरल्या सारखे राहते, व वजन कमी करण्यास मदत होते. मखाना खल्यामुळे हाडे मजबूत होतात. मखाना मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. या मुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅाल कमी राहते व जास्त ताकद निर्माण होते.
मखान्यात मॅग्नेशियम गुणधर्म असल्यामुळे आराम आणि झोप सुधारते; आपल्या शरिराला शांत झोप मिळते.
महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोनल बॅलन्स स्थिर राहण्यासाठी मखाना फार उपयुक्त आहे.पारंपारिक औषधांचा विचार केला तर, मखाना ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी हार्मोनल असंतुलन कमी करण्यास मदत करते.
मखान्याचे पौष्टिक गुणधर्म –
कॅलरीज: ३५०–३७० किलोकॅलरी
प्रथिने: ६०-६५ ग्रॅम
कार्बोहायड्रेट्स: ६५-७० ग्रॅम
चरबी: ०.१-०.५ ग्रॅम (खूप कमी)
फायबर: ७-१० ग्रॅम
कॅल्शियम: ६०-८० मिग्रॅ
लोह: १.४-१.८ मिग्रॅ
मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस: लक्षणीय प्रमाणात आढळतात
अँटिऑक्सिडंट्स: फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स
एका भांड्यात मखाने टाका त्या मध्ये हलके तूप टाकून हलके भाजून घ्या, तूम्हाला जर चटपटीत हवे असल्यास त्या मध्ये मिठ किंवा हलकी चिमूटभर काळी मिरी ची पूड टाका या मुळे मखान्याला एक विशिष्ट अशी चव येईल.
जे योगा किंवा व्यायाम करतात अशा लोकांसाठी मखाना फार उपयुक्त आहे, मखाना दुधासोबत खाल्याने शरिरात ताकद निर्माण होते. मखान्याचा उपयोग खिर बनवण्यासाठी सुद्दा करता येतो.